परमबीर सिंह प्रकरणात CIDची पहिलीच कारवाई ; 'त्या' दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक

नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीकडून (CID)ही पहिलीच अटक आहे.
 Paramvir Singh
Paramvir Singhsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Mumbai police) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांच्याविरोधात वसुलीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीआयडीकडून (CID)ही पहिलीच अटक आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

या गुन्हयात परमबीर सिंग पोलिस, उपायुक्त अकबर पठाण सह आठजणांवर गुन्हा दाखल आहे. ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयडीचे अधीक्षक मारुती जगताप यांनी ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष 9 मध्ये कार्यरत होते. इतर आरोपीची भूमिका स्पष्ट झाल्यास त्यांना अटक होईल असे जगताप यांनी म्हटले आहे.

श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यामध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण महाराष्ट्र सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

अटक करण्यात आलेले नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना मंगळवारी मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ८ वे न्यायालय मुंबई येथे हजर करण्यात येणार आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Paramvir Singh
आता मोदींना कुठली शिक्षा द्यावी ; नवाब मलिकांचा प्रश्न

गोपाळे आणि कोरके यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने तक्रारदार अग्रवाल यांच्या विरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करून मोक्का अंतर्गत कारवाई न करण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे, असे मारुती जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com