

Sushma Andhare News : मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.
दरम्यान, हे आरोप परिणय फुके यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले की, माझ्या मुलावर कुटुंबावर झालेल आरोप चुकीचे आणि आक्षेपार्ह आहेत. अपघातग्रस्त वाहनात आपला मुलगा नव्हता, तो दुसऱ्या गाडीत होता. ज्या मुलाचे निधन झाले तो आपल्या मुला सारखाच होता.
परिणय फुके यांच्या खुलाशानंतर सुषमा अंधारे यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगत त्यांचा मुलगा गाडीचालवत होता, मद्यधुंद अवस्थेत होता, याचे पुरावे सीसीटिव्ही आपल्याकडे असल्याचे सांगितले.
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, दोन फाॅर्च्युनर गाड्या त्यामध्ये आमदार परिणय फुके यांचे चिरंजीव यथार्थ फुके होते. गाडीमध्ये यथार्थ याचे मित्र यामध्ये पाच मुलं पाच मुली यांचा समावेश होता. त्यातील एक फाॅर्च्युनर गाडी स्वतः परिणय फुकेंचा मुलगा यथार्थ फुके चालवत होता. अत्यंत मद्यधुंद अवस्थेत ही गाडी चालवत असल्याने आणि गाडीचा वेग अतिशय जास्त असल्याने गाडीवरचे नियंत्रण सुटले. गाडी पुढे चेक पोस्टवर जाऊन आणि त्यानंतर एका झाडावर जाऊन आदळली. ज्याच्यामध्ये दिशांत आली या तरुणाचा मृत्यू झाला.
'परिणय फुके म्हणत आहे की हे सगळं आरोप चुकीचे आहेत. परिणयजी माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आरोप चुकीचे असतील तर यथार्थ फुके कुठे आहेत हे माध्यमांना एकदा दाखवा. यथार्थ स्वतःच्या पायावर तंदुरुस्त आहे हे एकदा माध्यमांच्या समोर येऊन माध्यमांना स्पष्ट करा.', असे आव्हान अंधारे यांनी दिले.
MH40 AH7227 या क्रमांकाची फॉर्च्यूनर गाडी जी अपघातग्रस्त झाली आहे. ती गाडी परिणय फुकेजी तुमच्या नावावर आहे. अपघातग्रस्त गाडी ही बेचिराख झाली आहे. या गाडीच्या व्हिडिओमध्ये दारुच्या बाटल्या देखील दिसतात. त्यामुळे इकडच तिकडं खोटं बोलू नका. याच्यामध्ये मुख्यमंत्री महोद्ययांनी काय भूमिका घ्यायची हे स्पष्ट केले पाहिजे, असे देखील अंधारे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.