OBC reservation on Sharad Pawar : 'स्थानिक' निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक; भाजपला रोखण्यासाठी काढले 'ओबीसी कार्ड'

OBC card politics News : विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती सत्तेत आली. त्यावेळी ओबीसीचा मुद्दा गेमचेंजर ठरला होता.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्येच आता निवडणुका जवळ आल्याने पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा देखील तापला आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती सत्तेत आली. त्यावेळी ओबीसीचा मुद्दा गेमचेंजर ठरला होता. त्याचा फायदा भाजपासह एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला होता.

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले असतानाच आता ओबीसी मते पदरात पाडण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यातच आता शरद पवार यांनी ओबीसी मतांमध्ये वाढ करण्यासाठी नवा डाव टाकला असून भाजपचा गड असलेल्या नागपूरमधून क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंडल यात्रेचे रणशिंग फुंकले आहे. ही मंडल यात्रा 52 दिवसांची असून प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. त्यामधून ओबीसी मतदाराना आपल्याकडे वळवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे.

Sharad Pawar
BJP ची खरी स्ट्रॅटजी उघड ? Rahul Gandhi यांचे पुराव्यासह BJP आणि Election Commission वर गंभीर आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devandra fadnavis) यांनी गोव्यातील ओबीसी संमेलनातून भावनिक आवाहन केले आहे. दुसरीकडे मराठा -ओबीसी एकीची साद मनोज जरांगे पाटील घालत आहेत. त्यातच ओबीसी मतासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी आता याच ठिकाणी मंडल यात्रेचा श्रीगणेशा केला आहे. 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंडल यात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा नागपूरपासून 52 दिवसांत राज्यातील कानकोपऱ्यात जाणार आहे.

Sharad Pawar
NCP News : धाराशीव राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर ? अजित पवार भाकरी फिरवणार? की जुनाच चेहरा देणार..

शनिवारी नागपूरमध्ये या मंडल यात्रेला शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची घोषणा केली होती. मंडल आयोगाला घटनात्मक दर्जा पण मिळाला. त्यावेळी राज्यात शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यांनी या आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू केल्या होत्या. त्यातूनच मग ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मंडलच्या शिफारशी लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते आणि त्यावेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता, अशी माहिती यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Sharad Pawar
Aaditya Thackeray : 'रडू नका, एवढी भीती होती तर मग...', आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले

गेल्या कित्येक वर्षात शरद पवार (Sharad Pawar) यांनी ओबीसी समाजासाठी जे योगदान दिले आहे. ते जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मंडल यात्रा हाती घेण्यात आली आहे. जेव्हा मंडल आयोग लागू करण्यात आला होता. तेव्हा कमंडल यात्रा कोणी काढली होती, याची आठवण आताच्या मंडल यात्रेतून करून देण्यात येणार आहे. नागपूर येथून मंडल यात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिव-शाहू-आंबेडकरांचा विचार शरद पवार हे पुढे घेऊन जात आहेत, महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण केले जात आहेत. जाती- धर्मात वाद निर्माण केले जात आहे, असे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

Sharad Pawar
Sharad Pawar : 'दोघे भेटले, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली...', शरद पवारांचा गोप्यस्फोट

राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार मंडल यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मंडल यात्रा राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहे. ही यात्रा 52 दिवसांची असून ती प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात जाणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
BJP Vs Shivsena : प्रभाग रचनेत फिक्सिंग : भाजप आमदाराचा 'लेटर बॉम्ब'; मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवसेनेची तक्रार

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मदार असलेल्या ओबीसी समाजाला पुन्हा पुरोगामी विचाराकडे आणण्याची खेळी यशस्वी होते का? नागपूर पुन्हा देशातील परिवर्तनाचे नांदी ठरते का, याची उत्तरे मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण निवडणुकीच्या तोंडावरच शरद पवार यांनी ओबीसीचा पत्ता टाकला आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजप की शरद पवार या दोघांपैकी हुकमी एक्का कोण टाकतो? त्यावर बरेच काही अवलंबुन असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
NCP SP's Mandal Yatra : भाजप प्रवेशाची चर्चा असलेल्या बड्या नेत्याची पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला दांडी; चर्चेला उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com