

Parth Pawar News : विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा संघर्ष तीव्र झाला आहे. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या विषयीचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या हातात पक्षाची सुत्रे आली. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते 10 मार्च या दरम्यान झालेल्या कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र पाठवले होते.त्यानंतर माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांमुळे प्रफुल पटेल हे नाराज होते.
पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रफुल पटेल यांच्यावर विश्वास व्यक्त करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, पक्षात पार्थ पवार यांचे वाढते प्रस्थ पक्षातील जुन्या मंडळींना खूप लागल्याची चर्चा आहे.
त्यांनी विधान परिषदेसाठी पुण्यातील एका उद्योगपतीच्या मुलाच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र, प्रस्थापित नेत्यांनी या नावाला विरोध केल्याचे बोलले जात आहे. तसेच वेगवेगळ्या राजकीय समीकरणांचा विचार करत माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली.
नरेश अरोरा यांच्या कंपनीकडे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे काम होते. विधानसभेनंतर हे काम पुढे सुरू होते. महापालिका निवडणुकीमध्ये अरोरा यांच्या कंपनीवर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या निधनानंतर अरोरा यांनी प्रफुल पटेल यांना पक्षाचे अध्यक्ष तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावरून पक्षात धुसफूस सुरू होती. दरम्यान, पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांच्यातील वादातून अरोरा यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.