Solapur News : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल; चोर समजून केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Dhavalsinh Mohite Patil News : चोर समजून तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीत तरुणाचा मृत्यू
 Dhavalsinh Mohite Patil
Dhavalsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील बंगल्यात चोरी करण्याच्या हेतूने शिरल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case has been registered against Congress's solapur president Dhavalsinh Mohite Patil)

दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह इतर संशयिताचा शोध घेत आहेत. या मारहाणीत अभिजीत उत्तम केंगार (वय २१, रा. वाघोली, ता. माळशिरस) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अकलूजचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी स्वतः फिर्याद दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Dhavalsinh Mohite Patil
Thackeray Attack On BJP : उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मुळावरच घाव घातला; ‘श्यामाप्रसाद मुखर्जींचा दाखला देत...’

अकलूज येथे धवलसिंह मोहिते-पाटील यांचा प्रतापगड नावाचा बंगला आहे. त्या बंगल्यात अभिजित केंगार हा १८ जानेवारीच्या मध्यरात्री उशिरा शिरला होता. केंगार हा चोरी करण्याच्या उद्देशानेच बंगल्यात शिरला आहे, या संशयातून त्याला काठ्यांनी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली हेाती. पण तपासात मारहाणीत मृत्यू झाल्याचे समजताच धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Dhavalsinh Mohite Patil
Solapur Congress : ‘स्थानिक उमेदवार दिला तर पाडापाडी होईल; दक्षिणमधून मोहिते पाटलांना उमेदवारी द्या’

पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, गिरझणीचे माजी सरपंच सतीश संभाजी पालकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मयूर नवनाथ माने, हिरा रामचंद्र खंडागळे (रा. अकलूज) आणि इतर अनोळखी चौघांच्या विरोधात गुन्हा (कलम ३०४,३२४, ३४) दाखल करण्यात आला आहे. पालकर आणि माने यांना अटक करण्यात आली आहे. अकलूजच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील तपास करीत आहेत.

 Dhavalsinh Mohite Patil
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी, गिरणी कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली अन् मंत्रीही केलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com