Kunbi Certificate Scam : 'एजंट' नाही म्हणून तब्बल 1136 कुणबी दाखले रखडवले; अधिकाऱ्यांच्या कारभाराचा मराठा समाजाकडून मोठा भांडाफोड

Kunbi certificate delay controversy Maharashtra : एजंटमार्फत न आल्याने तब्बल 1136 कुणबी दाखले रखडवल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे. या प्रकरणामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमका काय आहे प्रकार?
Kunbi certificate delay controversy
Kunbi certificate delay controversySarkarnama
Published on: 
Updated on: 

राज्यात मराठा समाजातील कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीवरून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाची दखल राज्य सरकारला घेणे भाग पडत असताना कोल्हापुरात अधिकाऱ्यांचा कारनामा सकल मराठा समाजाने उघड केला आहे. समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्या असताना अधिकाऱ्यांनी एजंट मार्फत न आल्यामुळे 1136 जणांना कुणबी प्रमाणपत्र नाकारले असल्याचा धक्कादायक प्रकार सकल मराठा समाजाने उघडकीस आणला आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या ढिसाळ आणि दिरंगाईच्या कारभाराविरोधात कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला. प्रलंबित १,१३६ कुणबी जात प्रमाणपत्रांचा निपटारा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि निवेदनाची जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांना समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. अखेर संतापलेल्या आंदोलकांनी निषेध म्हणून थेट समितीचे उपायुक्त भारत केंद्रे यांच्या खुर्चीलाच इशारा निवेदन चिकटवले व प्रशासनाला १० दिवसांचा अंतिम अल्टिमेटम दिला.

Kunbi certificate delay controversy
निवडणुकीआधीच भाजपला धक्का, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जवळील दोन नेत्यांनी सोडला पक्ष, जाहीर केली भूमिका

जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामात कार्यालयाकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. यापूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान कार्यालयाने १,१३६ प्रकरणे 'निकाली' काढल्याचे सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात कागदपत्रांमधील त्रुटींची पूर्तता न झाल्याचे कारण देत ही सर्व प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.

​

याबाबत विचारणा केली असता, "ऑनलाइन अर्ज भरताना महा ई-सेवा केंद्रांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी जोडले गेल्याने त्रुटींचे मेसेज मूळ अर्जदारांपर्यंत पोहोचले नाहीत," असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर समाजाच्या वतीने या १,१३६ अर्जदारांची यादी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती, जेणेकरून समाजाचे कार्यकर्ते स्वतः त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून कागदपत्रांची पूर्तता करून घेऊ शकतील. मात्र, कार्यालयाने यादी देण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी कार्यालयात दाखल झाले असता, समितीचे सदस्य संभाजी पवार समोर आले. त्यांनी या निवेदनाची जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत "वरिष्ठांना विचारा, सोमवारी या" अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीमुळे आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी "जर तुम्ही जबाबदारी घेत नसाल, तर हे निवेदन तुमच्या हातात देणार नाही," अशी भूमिका घेतली आणि थेट उपायुक्त भारत केंद्रे यांच्या खुर्चीलाच निवेदन चिकटवून आपला निषेध नोंदवला.

​यावेळी बोलताना वसंतराव मुळीक म्हणाले की, "निरोप देऊन देखील जाणीवपूर्वक उपस्थित न राहिलेले उपायुक्त भारत केंद्रे यांचा निषेध म्हणून आम्ही हे निवेदन त्यांच्या खुर्चीला चिकटवले आहे. महसूल विभागाकडून रीतसर मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांची जात पडताळणी समितीकडून जाणीवपूर्वक त्रुटी काढून अडवणूक केली जात आहे. हे प्रकार तातडीने न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."

Kunbi certificate delay controversy
Kolhapur News: 204 बांधकामांवरून महायुतीतच संघर्ष; कारभारी विरुद्ध नगरसेवक, 250 कोटींची चर्चा!

एजंटगिरीला खतपाणी घालणाऱ्यांना 'कोल्हापुरी हिसका' दाखवणार – रूपेश पाटील

​यावेळी रूपेश पाटील यांनी कार्यालयातील अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. ते म्हणाले की, "सर्वसामान्य मराठा तरुण आणि विद्यार्थ्यांचे दाखले बारीक-सारीक त्रुटी काढून जाणूनबुजून अडकवले जात आहेत, तर दुसरीकडे एजंटामार्फत येणारी कामे झटपट मार्गी लावली जातात. 'मला विचारू नका, वरिष्ठांना विचारा' असे म्हणत अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. हा कार्यालयाचा भोंगळ कारभार आणि एजंटगिरीला खतपाणी घालण्याचे षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही. येत्या १० दिवसांत या १,१३६ जणांची यादी जाहीर करून विशेष कॅम्पद्वारे त्यांना फोन, मेसेज आणि ग्रामपंचायतीमार्फत निरोप देऊन त्यांचे दाखले निकाली काढावेत. अन्यथा ११ व्या दिवशी या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडून 'कोल्हापुरी हिसका' आणि 'कोल्हापूरचा पट्टा' काय असतो, हे दाखवून देऊ, असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.