Kolhapur News: 204 बांधकामांवरून महायुतीतच संघर्ष; कारभारी विरुद्ध नगरसेवक, 250 कोटींची चर्चा!

Kolhapur Illegal Construction: गांधीनगर रोडवरील 204 बेकायदा बांधकामांच्या नियमितीकरणावरून कोल्हापूर महापालिकेत वाद; महायुतीतील नगरसेवक आणि कारभाऱ्यांमध्ये संघर्षाची चर्चा.
Kolhapur Illegal Construction
Kolhapur Illegal ConstructionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील गांधीनगर रोडवरील 204 बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी महापालिकेच्या राजकीय आखाड्यात मोठ्यात घडामोडी घडत आहेत. ही बेकायदेशीर बांधकाम नियमित करण्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी सुपारी फोडल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला हा आकडा 100 कोटींचा असला तरी जवळपास 58 एकर जागा आणि त्यावरील 204 बांधकामे असे मिळून ही सुपारी जवळपास 250 कोटी पर्यंत असण्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्यामुळे कारभारी नेते विरुद्ध महायुतीतील नगरसेवक असा संघर्ष पेटला आहे.

नगरसेवकांना पाच पेट्यांचे आम्ही आमिष दाखवल्याने त्यांनीही आता कारभाऱ्यांना जाब विचारण्याचे धोरण ठेवले आहे. सत्तेतील प्रमुख पक्षांच्या नगरसेवकांनी एका ठिकाणी बैठक घेत कारभारी आणि नेत्यांना पर्यंत निरोप पोहोचवण्याचा चक्रव्यूह आखला आहे. शिवाय नाहक बदनामी पोटी विरोधक नगरसेवक देखील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव नामंजूर करण्याच्या हालचाली सर्वपक्षीय नगरसेवकांकडून आखल्या जात आहे.

गांधीनगर रोडवरील 204 बेकायदा बांधकामे न्यायालयाच्या निकालानंतर चर्चेत आली आहेत. ही बांधकाम नियमित करण्यासाठी काही कारभारी नेत्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी इतिहासातील सर्वात मोठी सुपारी फोडली असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.

नगरसेवकांना तूटपुंजे टोकन देऊन कारभारी आणि नेते मोठा हात मारण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण महायुतीच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना लागली आहे. नगरसेवकांना पाच लाखाचे टोकन देण्याची तयारी कारभारी नगरसेवकांनी घेतली आहे. सुरवातीला कारभारी नगरसेवकांनी ५३ कोटीची टोकन रक्कम घेतली असून एका कारभाऱ्यांच्या संस्थेत ही रक्कम ठेवल्याची चर्चा आहे.

Kolhapur Illegal Construction
Delimitation Bill: इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार राहणार अनुपस्थित?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिम्मिताने एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते देखील गांधीनगरच्या प्रश्नावर एकजूट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विरोधकांना विरोध करण्यापेक्षा आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचे धोरण नगरसेवकांनी घेतलेले दिसते. मात्र विरोधकांत नगरसेवक पेक्षा महायुतीतील नगरसेवकांमध्ये कारभाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या संतापाची जागा एका परिसरात झालेल्या पार्टीने घेतली.

सत्तेतील प्रमुख पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत कारभाऱ्यांच्या विरोधातच आवाज उठवण्याचे धोरण स्वीकारले आहे. या पार्टीमध्ये एवढा मोठा व्यवहार नेमका कोणी केला? त्यामध्ये आपला हिस्सा किती असेल? कारभाऱ्यांना किती मलिदा मिळणार? जर कारभाऱ्यांनी आणि नेत्यांनी कोट्यावधीची माया मिळवली तर आम्ही तुटपुंजे टोकन घेऊन कायदेशीर अडचणीत सापडणार का? यावर विचारमंथन या पार्टीमध्ये नगरसेवकांनी केले आहे.

Kolhapur Illegal Construction
Maharashtra Schools: शाळेतच मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण! राज्यातील 227 शाळांबाबत सरकारचा मोठा निर्णय

कारभाऱ्यांना या गोष्टीची भनक लागताच अनेक नगरसेवकांना थेट निवडणुकीतील आर्थिक मदतीचा दाखला नगरसेवकांपुढे मांडला आहे. काही नगरसेवकांना कारभार यांनीच दमदाटी केल्याची माहिती आहे. निवडणुकीला आम्ही जर मदत केली असेल तर आता हे पैसे का मागता? असा दम कारभाऱ्यांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नगरसेवकांनी देखील आमच्या नावावर गोळा केलेले पैसे? काही ठराविक जणांचे हित पाहणारे आहे का? असा सवाल या निमित्ताने कारभाऱ्यांपुढे नगरसेवकांनी केला आहे.

Kolhapur Illegal Construction
Congress: 'गद्दारांची मांदियाळी असताना..' राहुल गांधींनी शरद पवारांचा हात घट्ट पकडलेला फोटो व्हायरल; डिलिमिटेशनवरून काँग्रेसचा व्हिडिओ

जर महायुतीतील नगरसेवकांना अपेक्षित मोबदला मिळाला नाही तर येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव नाम मंजूर करण्याची तयारी देखील एका गटांनी घेतली आहे. तर दुसऱ्या गटाने आपल्याला काहीच नको पण कारभाऱ्यांच्या मतानुसार आम्ही वागतो. अशी भूमिका घेत पापात सहभागी न होण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे महायुती मधील नगरसेवकांमध्ये स्वतःच्याच लोकप्रतिनिधी बदल संतापाची भावना निर्माण झाली असून येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेची स्वप्ने पाहणाऱ्या एका कारभाऱ्याने यामध्ये प्रमुख भूमिका स्वीकारली आहे. मात्र निवडणुकीपासून सुरू असलेला हस्तक्षेपामुळे या कारभाऱ्याच्या विरोधात नगरसेवकांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या यासंदर्भात महापालिकेच्या चौकात दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी मागील सर्वसाधारण सभा का गुंडाळली याचे कारण यामध्ये दडले असल्याचे सांगितले जाते. शिवाय सत्ताधाऱ्यांना सर्वसाधारण सभा घेण्याची भीती देखील या कारणामुळे वाटत असल्याने सध्या नगरसेवकांची मनधरणी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असल्याचे देखील सांगितले जाते.

Kolhapur Illegal Construction
Shiv Sena News: 'सत्तेचा निर्णय अंतिम नसतो!' एकनाथ शिंदेंनाच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं आव्हान; थेट हायकोर्टात धाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.