Solapur-Madha Lok Sabha Voting सोलापुरात दुपारी तीनपर्यंत 40.18, तर माढ्यात 39 टक्के मतदान; माळशिरसने फलटणला टाकले मागे

Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची आकडेवारी सकाळपासूनच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाने राखली असून 42.38 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पंढरपूरमध्ये होत असून दुपारी तीनपर्यंत 38.26 टक्के मतदान झाले आहे.
Ram Satpute-Praniti Shinde
Ram Satpute-Praniti ShindeSarkarnama

Solapur, 07 May : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी तीनपर्यंत सोलापूरमध्ये 40.18 टक्के, तर माढा लोकसभा मतदारसंघात ३९ टक्के मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी फलटण आघाडीवर होते. मात्र, दुपारी तीनपर्यंत माळशिरसने फलटणला मागे टकात ४३.७३ टक्के मतदान नोंदविले आहे, तर फलटणमध्ये ४२.८६ टक्के मतदान झाले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची आकडेवारी सकाळपासूनच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाने राखली असून 42.38 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पंढरपूरमध्ये होत असून दुपारी तीनपर्यंत 38.26 टक्के मतदान झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute-Praniti Shinde
Lok Sabha Election 2024 voting : महाराष्ट्रात दुपारी 1 पर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक, माढ्यात सर्वांत कमी मतदान

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माळशिरस मतदारसंघात मतदानासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. सकाळी फलटणमध्ये सर्वाधिक मतदान झाले होते, तर माळशिरसमध्ये त्या खालोखाल मतदान झाले होते. मात्र दुपारी तीनपर्यंत फलटणला मागे टाकत माळशिरस एक नंबरवर आले आहे.

माळशिरसमध्ये टक्के 43.73 टक्के, तर फलटणमध्ये 42.86 तर एवढे मतदान झाले आहे. माळशिरस आणि फलटणनंतर सर्वाधिक मतदान हे सांगोला तालुक्यात झाले असून ते 39.48 टक्के एवढे आहे, तर माढ्यात 37.05%, करमाळ्यात 35.97% तर माण मध्ये 36.15 एवढे मतदान झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 39.21 टक्के मतदान अकरा वाजेपर्यंत झाले आहे.

Ram Satpute-Praniti Shinde
Madha Lok Sabha Election : सांगोल्यात देशमुख, पाटलांचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना केले रक्तबंबाळ

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मतदान हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात झाले असून ते 42.38 टक्के इतके आहे, तर सर्वात कमी मतदानाची नोंद पंढरपूर मतदारसंघात झाले असून ते 38.26 टक्के आहे. याशिवाय मोहोळ मतदारसंघात 41.05 टक्के, सोलापूर शहर उत्तर मध्ये 41.55, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात 38.43, अक्कलकोट मतदारसंघात 39.06 टक्के मतदान झाले आहे.

Ram Satpute-Praniti Shinde
Madha Lok Sabha : करमाळ्यात कांद्याने बटन दाबून शेतकऱ्याने केले मतदान; व्हिडिओ व्हायरल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com