Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांनी वेळेत टाकलेला डाव ठरला ‘जॅकपॉट’; ‘ती’ 41 मते ठरणार निर्णायक

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदारयादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या रणनीतीमुळे त्यांना 41 मतांचा फायदा होणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 13 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. बॅंकेच्या प्रारूप यादीवरील हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली असून त्या सुनावणींवरील आदेशांचे सध्या वाटप सुरू आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा बॅंकेच्या मतदारयादीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी टाकलेला डाव यशस्वी ठरला आहे, त्यामुळे परिचारक यांना तब्बल 41 मतांचा फायदा होणार आहे. परिचारकांनी लढवलेल्या भन्नाट शक्कलची सध्या बॅंकेच्या वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यावर ३५५ हरकती, सूचना दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर जिल्हा बँकेचे निबंधक तथा विभागीय सहनिबंधक आहेर यांच्यासमोर ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सुनावणी झाली. सुनावणीनंतर ३५५ हरकतींपैकी १९० आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. उर्वरित १६५ आदेश आज (ता. १३ ऑक्टोबर) मिळणार आहेत.

सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या दुग्ध मतदारसंघात सध्या माढा आणि माळशिरस तालुक्याचे वर्चस्व आहे. मात्र, आता पंढरपूर तालुक्यातील ४१ संस्था मतदार यादीत आल्या आहेत. पंढरपुरातील ४१ आणि सांगोल्यातील २० संस्था अवसायनात असल्याने त्यांचे ठराव करता येत नव्हते; परंतु त्यांचे अपिल दुग्धच्या सहनिबंधकांकडे सुरू होते.

Prashant Paricharak
Solapur Dcc Bank : ‘दक्षिण’मध्ये DCC बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघात हसापुरे पॅटर्न पुन्हा एकदा ठरला पॉवरफुल्ल; सर्वच हरकती फेटाळल्या...

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध संस्थांनी ठराव करून वेळेत सहाय्यक निबंधकांकडे दप्तरी दाखल केले. त्यानंतरच्या काळात दुग्धच्या सहनिबंधकांनी अवसायनाच्या कारवाईला स्थगिती दिली, त्यामुळे वेळेत ठराव झाल्याने या संस्थांचा समावेश मतदार यादीत झाला आहे. सांगोल्यातील संस्थांचे वेळेत ठराव न झाल्याने त्यांचा मात्र मतदार यादीत समावेश होऊ शकला नाही.

उच्च न्यायालयात सुनावणी

माढा तालुक्यातील ६० दुग्ध संस्थांवर सांगोला तालुक्यातील पारे येथील अजिंक्य दूध संस्थेचे मल्हारी गायकवाड यांनी घेतलेली हरकत फेटाळण्यात आली आहे. सहनिबंधकांच्या आदेशाची प्रत घेऊन गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात ॲड. अभिजीत कुलकर्णी यांच्या माध्यमातून धाव घेतली आहे.

Prashant Paricharak
Someshwar Sugar Result : ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांना चॅलेंज देणाऱ्या पुरुषोत्तम जगतापांना राष्ट्रवादीने धूळ चारली; 6464 मतांनी पराभव, पक्षाची सात जागांवर बाजी...

या अपिलावर आजच (ता. 13 ऑक्टोबर) तातडीने सुनावणी ठेवण्यात आली आहे. या शिवाय जिल्हा दूध संघाचे संचालक मारुती लवटे यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या मतदार यादी बनविण्याच्या प्रक्रियेवर सुनावण्यांचे सावट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com