Solapur Dcc Bank : ‘दक्षिण’मध्ये DCC बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघात हसापुरे पॅटर्न पुन्हा एकदा ठरला पॉवरफुल्ल; सर्वच हरकती फेटाळल्या...

Suresh Hasapure News : सोलापूर जिल्हा बँकेच्या दक्षिण सोलापूर सोसायटी मतदारसंघातील सुरेश हसापुरे समर्थकांच्या मतदार ठरावांवरील जवळपास 45 हरकती विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी फेटाळल्या. त्यामुळे हसापुरे यांची बाजू मजबूत झाल्याची चर्चा आहे.
Solapur Dcc Bank-Suresh Hasapure
Solapur Dcc Bank-Suresh HasapureSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 13 October : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या समर्थकांच्या ताब्यात असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या मतदार प्रतिनिधी ठरावावर जवळपास ४५ हरकती घेण्यात आल्या होत्या. भाजप आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र बिराजदार, रईस शेख आणि ईस्माईल शेख यांनी घेतलेल्या सर्वच्या सर्व हरकती विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी फेटाळून लावल्या आहेत. या आदेशामुळे दक्षिण सोलापूर सोसायटी मतदारसंघात हसापुरे यांचे पारडे पुन्हा एकदा जड झाल्याचे मानले जात आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर घेतलेल्या ३५५ हरकतींपैकी १९० आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. उर्वरित १६५ आदेश आज (ता. १३ ऑक्टोबर) मिळणार आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ, हिपळे, शंकरनगर, अंत्रोळी, होटगी स्टेशन, बंकलगी, निंबर्गी, सादेपूर, बसवनगर, कंदलगाव, भंडारकवठे, तिल्हेहाळ, कुसूर, विंचूर, तोगराळी, सिंदखेड, शंकरनगर या सोसायट्यांमधून डीसीसीचे मतदार प्रतिनिधी म्हणून ज्यांचे ठराव झाले आहेत, त्या व्यक्ती त्या गावातील रहिवासी नाहीत, त्या व्यक्तींच्या नावावर गावात जमीन नाही, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.

या हरकतींवर सहनिबंधक आहेर यांनी सभासदत्व ठरविण्याचा आमचा अधिकार नाही, हे कारण देत सर्वच्या सर्व हरकती नामंजूर केल्या आहेत. ही नावे आता अंतिम मतदार यादीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आदेशामुळे जिल्हा बँकेच्या दक्षिण सोलापूर सोसायटी मतदारसंघात पुन्हा एकदा हसापुरे पॅटर्न पॉवरफुल्ल झाला आहे.

Solapur Dcc Bank-Suresh Hasapure
Uttam Jankar : पवारांच्या आमदारांची वीज अधिकाऱ्यांना दमदाटी; बंगल्यावर बोलावून हातात हंडे देत कपडे काढण्यास सुनावले

माढा तालुक्यातील ६० दुग्ध संस्थांवर घेतलेली हरकत सहनिबंधक आहेर यांनी फेटाळली आहे. त्यामुळे त्या संस्था मतदार यादीत कायम राहिल्या आहेत. पंढरपुरातील ४१ दूध संस्थाची मागणी सहनिबंधक आहेर यांनी मान्य केल्याने त्यांचा समावेश मतदार यादीत झाला आहे.

सांगोल्यातील १२ दुग्ध संस्थांची हरकत मान्य झाल्याने त्यांचाही अंतिम मतदार यादीत समावेश निश्चित मानला जात आहे. या शिवाय ५० जणांच्या नावात दुरुस्तीची, हसापुरे यांच्या वयाच्या बदलाची हरकत मान्य झाली आहे.

Solapur Dcc Bank-Suresh Hasapure
Someshwar Sugar Result : ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांना चॅलेंज देणाऱ्या पुरुषोत्तम जगतापांना राष्ट्रवादीने धूळ चारली; 6464 मतांनी पराभव, पक्षाची सात जागांवर बाजी...

जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी येत्या बुधवारी (ता. १४ ऑक्टोबर) प्रसिध्द होणार आहे. न्यायालयाने काही आदेश न दिल्यास साधारणतः २३ ते २४ ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com