Someshwar Sugar Result : ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांना चॅलेंज देणाऱ्या पुरुषोत्तम जगतापांना राष्ट्रवादीने धूळ चारली; 6464 मतांनी पराभव, पक्षाची सात जागांवर बाजी...

NCP Panel Victory News : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राजवर्धन शिंदे यांनी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा 6464 मतांनी पराभव केला. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने सात जागा जिंकल्या असून उर्वरित जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत.
Sunetra Pawar-rajvardhan shinde-purushottam jagtap
Sunetra Pawar-rajvardhan shinde-purushottam jagtapSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune, 12 October : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात दंड थोपटणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजवर्धन शिंदे यांनी 6464 मतांनी दणदणीत पराभव केला आहे. शिंदे हे कारखान्याचे विद्यमान संचालक आणि माजी अध्यक्ष आहेत.

दरम्यान, कारखाना निवडणुकीत निकालात आतापर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलने सात जागा जिंकल्या आहेत. त्या सर्वसाधारण गटातील सहा आणि ब वर्ग गटातील एका जागेचा समावेश आहे. उर्वरीत सर्व जागांवर राष्ट्रवादीचे सर्वच सर्व उमेदवार हे मोठ्या आघाडीवर आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी २१ विरुद्ध ० अशी क्लिनस्वीप देणार, हे आता निश्चित मानले जात आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या ‘ब’ वर्ग प्रतिनिधी गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे हे विजयी झाले आहेत. त्यांनी विजयाचे खाते उघडले होते. सोरटे यांना निवडणुकीत 131 मतांपैकी तब्बल 92 मते मिळालेले आहेत, त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

दरम्यान, निंबुत-खंडाळा या सर्वसाधारण गटाततून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजीत काकडे, शिवसेना आमदार विजय शिवतारे यांच्या गटाचे डॉ. वसंत दगडे विजयी झाले आहेत.

प्रमोद काकडे यांना १४९६२ मते मिळाली असून त्यांनी तब्बल ८६९० मतांनी विजय मिळविला आहे. अभिजित काकडे यांना १४०६६ मते मिळाली असून त्यांनीही ७७६४ मतांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे वसंतराव दगडे यांनी १३९८९ मते घेत तब्बल ७७१७ मतांनी बाजी मारली आहे.

Sunetra Pawar-rajvardhan shinde-purushottam jagtap
Someshwar Sugar Factory Result : सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक : निंबूत-खंडाळा सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीचे तिघे 4500 मतांनी आघाडीवर...

निवडणुकीत सर्वाधिक लक्ष गट नंबर दोन असलेल्या मुरूम-वाल्हेकडे लागले होते. कारण सुनेत्रा पवार यांना चॅलेंज देणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे या गटातून निवडणूक लढवत होते. मात्र, मतदारांनी जगताप यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे.

सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक तथा माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी पुरुषोत्तम जगताप यांना अस्मान दाखवत 6464 मतांनी त्यांचा पराभव केला आहे. शिंदे यांना १३९३५ मते घेतली असून जगताप यांना ७३२६ मते मिळाली आहेत.

मुरूम-वाल्हे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदे यांच्यासोबत विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड हे विजयी झाले आहेत. विक्रम भोसले यांना १३७९०, तर ऋषिकेश गायकवाड यांना १३८६२ मते मिळाली आहेत. भोसले आणि गायकवाड यांनी जगताप पॅनेलचे वैभव गायकवाड आणि सतिश संकुठे यांचा दणदणीत पराभव केला आहे.

Sunetra Pawar-rajvardhan shinde-purushottam jagtap
Someshwar Sugar Factory Result : ‘सोमेश्वर’चा पहिलाच निकाल सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने; संग्राम सोरटे दणदणीत मतांनी विजयी

सध्या सर्वसाधारणमधील गट क्रमांक तीन होळ मोरगाव मतदासंघाची मतमोजणी सुरू असून त्या गटातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. त्यांचे मताधिक्य तब्बल 7 हजारांपर्यंत कायम राहील, अशी सध्याची परिस्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com