Kolhapur Election: एक ना दोन,10 वर्ष संधी हुकली; 49 माजी नगरसेवकांची पुन्हा मैदानात उडी; मुकाबला सोपा नसणार

Kolhapur Political News: आता मात्र सर्वच मतदारसंघांमध्ये सर्वसाधारणचा एक गट निर्माण झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी थेट मैदानात उडी घेतली आहे. या दहा वर्षात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर माजी नगरसेवकांचा मुकाबला थेट नव्या आणि तगड्या उमेदवारांसोबत होणार आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या 2015 च्या निवडणुकीनंतर अनेकांची संधी हुकली होती. मात्र, पुढील पाच वर्षात संधीची वाट पाहत असताना आरक्षणामुळे रखडलेल्या महानगरपालिका निवडणूक (Mahapalika Election) रखडल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले होते. तर 2015 च्या निवडणुकीत आरक्षणाचा प्रभाग पडल्याने काही जणांनी पत्नी, मुलगा यांना रिंगणात उतरवले होते.

आता मात्र सर्वच मतदारसंघांमध्ये सर्वसाधारणचा एक गट निर्माण झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी थेट मैदानात उडी घेतली आहे. या दहा वर्षात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर माजी नगरसेवकांचा मुकाबला थेट नव्या आणि तगड्या उमेदवारांसोबत होणार आहे.

नवख्या उमेदवार आणि माजी नगरसेवक थेट आमने-सामने आल्याने प्रचारात होणार एकमेकांचा पंचनामा असून, विविध प्रभागांतील नऊ जागांवर माजी नगरसेवक एकमेकांना टक्कर देत आहेत, तर दोन जागांवर माजी नगरसेवकांच्या पत्नी आमने-सामने ठाकल्या आहेत. यामुळे प्रचारात एकमेकांच्या कामाचा पंचनामा होणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena), काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार), जनसुराज्यशक्ती पक्षाच्या चिन्हावर या लढती होत आहेत.

बऱ्याच वर्षांपासून महापालिकेच्या तयारीत माजी नगरसेवक होते. त्यांनी भागात संपर्क ठेवण्याबरोबरच विविध विकासकामेही केली होती. चार सदस्यीय प्रभागरचनेनंतर त्यांनी ज्या भागात पाठिंबा मिळणार, अशा ठिकाणीही संपर्क वाढवला. प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज सुरू झाल्यानंतर आरक्षणाचा मोठा अडथळा होता.

Kolhapur Municipal Corporation
BMC Mayor News: मुंबईचा महापौर कोण होणार? ठाकरे बंधू,फडणवीसांच्या दाव्यानंतर काँग्रेसची रोखठोक भूमिका आली समोर

त्यात अनेकांना संधी चालून आली. ज्यांची संधी हुकली, त्यांना पक्षांच्या जागा वाटपावेळी पत्नी, मुला, पतीसाठी नवीन दार उघडले. त्यामुळे माजी नगरसेवक जोमाने कामाला लागले. माजी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता अशा विविध पदांवर यापूर्वी काम केलेले 49 जण थेट रिंगणात उतरले.

त्यातील अनेकजण एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, तर काही जागांवर त्या 'माजीं' च्या पत्नींत लढत होत आहे. काही माजी नगरसेवक परंपरागत कट्टर विरोधक आहेत. ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यात 22 माजी नगरसेवक लढतीत आहेत. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे शहराचे लक्ष लागून राहणार आहे.

Kolhapur Municipal Corporation
BJP Vs Ajit Pawar : भाजप अजितदादांचा डाव त्यांच्यावरच उलटवणार? बावनकुळे पत्रकारांना 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'अजून निकाल लागलेला नाही'

संजय निकम-राजेश लाटकर (प्रभाग क्रमांक ४ड)

माधवी गवंडी-तेजस्विनी घोरपडे (प्रभाग क्रमांक ६-ब)

प्रतापसिंह जाधव-नंदकुमार मोरे (प्रभाग क्रमांक ६-ड)

शारंगधर देशमुख-राहुल माने (प्रभाग क्रमांक ९- ड)

जयश्री चव्हाण-यशोदा मोहिते-शारदा देवणे (प्रभाग क्रमांक ११-ब)

ईश्वर परमार विरुद्ध आदिल फरास (प्रभाग क्रमांक १२-ड)

अजित मोरे-विनायक फाळके (प्रभाग क्रमांक १४-ड)

रूपराणी निकम-भूपाल शेटे (प्रभाग क्रमांक १८-क)

विजयसिंह खाडे पाटील-मधुकर रामाणे (प्रभाग क्रमांक १९-ड)

रूपाली अजित पोवार-प्रियंका प्रदीप उलपे (प्रभाग क्रमांक १-क)

प्रेमा शिवाजी डवरी-दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला (प्रभाग क्रमांक १४-अ)

उमा बनछोडे-दीपा अजित ठाणेकर (प्रभाग क्रमांक ७-ब)

इंद्रजित बोंद्रे-शिवतेज खराडे (प्रभाग क्रमांक ८-ड)

रमेश पुरेकर-रियाज सुभेदार (प्रभाग क्रमांक १२-अ)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com