Maharashtra RTO : 735 आरटीओ अधिकाऱ्यांना दणका; ‘वाहन फिटनेस’ गैरव्यवहाराचा अहवाल मंत्र्यांकडे; आता नोटिसांचा धडाका!

Maharashtra RTO Fitness Certificate Scam : वाहनांच्या ‘फिटनेस’ प्रमाणपत्रातील कथित गैरव्यवहार प्रकरणात सात सदस्यीय चौकशी समितीचा सविस्तर अहवाल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे गेला आहे. तर तब्बल 735 RTO अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षक चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत.
Maharashtra Transport Department RTO Fitness Certificate Scam; Transport Minister Pratap Sarnaik
Maharashtra Transport Department RTO Fitness Certificate Scam; Transport Minister Pratap SarnaikSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील व्यावसायिक वाहनांना ‘३८ अ’ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या फिटनेस सर्टिफिकेट प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराने परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती तब्बल ७३५ आरटीओ अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांची यादी असलेला चौकशी अहवाल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

‘वाहने राज्यातच, फिटनेस परराज्यात’ या वृत्तातून हा प्रकार समोर आल्यानंतर परिवहन विभागाने सात सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने केलेल्या चौकशीनंतर मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशा एकूण ७३५ अधिकाऱ्यांची नावे अहवालात नमूद करण्यात आली आहेत.

आता या सर्व अधिकाऱ्यांना सोमवारपासून नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘३८ अ’ अंतर्गत झालेल्या प्रकाराबाबत खुलासा मागवला जाणार आहे. परिवहन विभागाच्या इतिहासात एकाच प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी आणि निरीक्षकांना नोटिसा बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Transport Department RTO Fitness Certificate Scam; Transport Minister Pratap Sarnaik
RTO Maharashtra : "आमच्या हद्दीत आलास तर..." : प्रामाणिक RTO अधिकाऱ्याला वरिष्ठाची दमदाटी; व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर 'मंत्र्यांचा हंटर'

कारवाईचा ‘फोकस’ नेमका कुणावर?

७३५ अधिकाऱ्यांची नावे समोर आली असली तरी या सर्वांवर एकाच वेळी कारवाई होणार नाही. खुलासे प्राप्त झाल्यानंतर संबंधितांची भूमिका तपासून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नेमकी कारवाई कोणावर होणार, याकडे परिवहन विभागाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर ‘भेटी-गाठी’ सुरू केल्याचीही चर्चा विभागात रंगली आहे. त्यामुळे चौकशीच्या कक्षेत आलेल्या सर्वांवर कारवाई होणार की काहींना दिलासा मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोटार वाहन निरीक्षकांवर कारवाईची शक्यता

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकार क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. ‘३८ अ’ अंतर्गत वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मोटार वाहन निरीक्षकांच्या अखत्यारित नसल्याने या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या निरीक्षकांवर कारवाईची शक्यता अधिक आहे.

Maharashtra Transport Department RTO Fitness Certificate Scam; Transport Minister Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Post : 'रत्नजडित मोबाईलची ती भेट.., फोन केला तर दादा बोलतील असंच वाटतं'; अजित पवारांच्या आठवणीत प्रताप सरनाईक भावुक

“चौकशी समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, त्यात ७३५ जणांचा समावेश आहे. सर्वांना नोटिसा देऊन विहित मुदतीत खुलासे मागवले जातील. खुलासे तपासल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांनी अधिकार क्षेत्राचे उल्लंघन केले आहे, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल,” असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यामुळे आता ७३५ अधिकाऱ्यांच्या खुलाशानंतर परिवहन विभाग कोणावर कारवाईचा बडगा उगारतो आणि या प्रकरणातील ‘बडे मासे’ कोण ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com