Mohite Patil Voting : मोहिते पाटलांवर कारवाई होणार; मुलाला मतदान केंद्रात नेणे भोवणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Solapur Zilla Parishad Election 2026 : सोलापूर जिल्हा परिषद मतदानादरम्यान फोंडशिरस येथे अर्जूनसिंह मोहिते पाटील हे मुलगा रुद्रराज याला मतदान कक्षात घेऊन गेले. ईव्हीएमवर मतदान कसे करायचे हे सांगितल्याचे व्हायरल व्हिडिओमधून दिसूत येत आहे. या प्रकरणी प्रशासनाने मतदार मोहिते पाटील, पोलिस कर्मचारी व केंद्राध्यक्षांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे.
Arjunsinh Mohite Patil
Arjunsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 February : सोलापूर जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांसाठी शनिवारी (ता. 08 फेब्रुवारी) मतदान झाले. त्या मतदानादरम्यान फोंडशिरस येथे अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी मतदान करताना आपल्या मुलाला सोबत नेले होते. त्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. त्याबाबत उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पोलिस कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष यांची चूक आहे, असे सांगून संबंधित मतदार, पोलिस आणि केंद्राध्यक्षांवर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी दोन ते तीन ठिकाणी नियमांचे उल्लघंन झाल्याचे पुढे आले आहे. यात मोहोळमध्ये एका हॉटेलबाहेर ईव्हीएम आढळून आली आहेत. त्या प्रकरणी तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. झोनल अधिकारी, त्यांचे सहायक आणि वाहनचालक यांची चूक असल्याचे दिसून आले आहे.

माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे अर्जूनसिंह मोहिते पाटील (Arjunsinh Mohite Patil) यांनी मतदान करताना स्वतःचा मुलगा रुद्रराज मोहिते पाटील याला केंद्रात घेऊन गेले. त्या मुलाला मतदान कसं करायचे आणि कोणते बटन दाबायाचे हे सांगताना मोहिते पाटील हे व्हायरल व्हिडिओमधून आढळून येत आहेत.

अर्जूनसिंह मोहिते पाटील यांची पत्नी वैष्णवीदेवी मोहिते पाटील ह्या माळशिरस पंचायत समितीच्या फोंडशिरस गणातून निवडणूक लढवत आहेत. अर्जूनसिंह यांनी शनिवारी मतदानाला जाताना आपला मुलगा रुद्रराज याला सोबत घेतले होते. त्यावरून वादंग उठले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना मोहिते पाटील म्हणाले, लहान मुलांना मतदान केंद्रात नेता येत नाही. पण त्याची इच्छा होती की, आपली आई निवडणुकीला उभा राहिलेली आहे, त्यामुळे मतदान कसं करतात, हे त्याला पहायचं होतं. त्यामुळे त्याला आतमध्ये नेलं आहे.

Arjunsinh Mohite Patil
EVM Issue : सोलापुरात हॉटेलबाहेर ईव्हीएम; निवडणूक अधिकारी म्हणाले, ‘आमच्या अधिकाऱ्यांकडून चूक झालीय; तिघे दोषी’

मुलाला मतदान केंद्रात नेताना निवडणूक अधिकाऱ्यांनी मुलांना आतमध्ये नेता येत नाही, असा आक्षेप घेतला. पण मी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना विनंती केली, त्याची आई निवडणुकीला उभी आहे, त्यामुळे मतदान कसं केलं जातं, हे त्याला पाहायचं होतं आणि त्यात काही चुकीचं आहे, असे मला वाटत नाही. मतदान कसं करतात, हे बघण्यासाठी तो आला होता, असा खुलासा अर्जूनसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस येथे ही घटना घडलेली आहे. त्या मतदान केंद्रावरील पोलिस कर्मचाऱ्यांची प्रथमदर्शनी चूक आहे, असं आमचं मत आहे. कारण, त्यांनी मोठ्या मुलाला मतदारांसोबत आतमध्ये प्रवेश देणं अपेक्षित नव्हतं. यात मतदान केंद्राध्यक्षांचीही चूक आहे.

Arjunsinh Mohite Patil
Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणूक अटळ? आज फैसला; आमच्याकडे पुरेसे संख्याबळ, महायुतीच्या भूमिकेनंतर...

एखाद्यी व्यक्ती मतदान करताना गोपनीयतेचा भंग होईल, असे कृत करत असेल तर संबंधित मतदाराला त्यापासून रोखणं हे मतदान केंद्राध्यक्षांचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्यांनी पोलिसांनी मदत घेणे अपेक्षित होते. पण तसं काही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार चुकीचा असून त्या प्रकरणी संबंधित मतदार, पोलिस कर्मचारी आणि मतदान केंद्राध्यक्ष यांच्यवर कारवाई होईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com