
Solapur, 05 September : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परीविक्षाधिन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजली कृष्णा यांना दम देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका हाेताना दिसत आहे. त्यानंतर सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे तातडीने माढा तालुक्यात घटना घडलेल्या कुर्डू गावात पोचले आणि शासनच शासनावर कशा प्रकार कारवाई करतंय? असा सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले, कुर्डू (ता. माढा, जि. सोलापूर) गावात काम करणारी यंत्रणा ही ग्रामपंचायत आहे. अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी त्या संबंधित अधिकारी आल्या होत्या. पण, अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्याचा अधिकार हा महसूल प्रशासनाचा आहे, तो पोलिस प्रशासनाचा नाही.
उमेश पाटील म्हणाले, महसूल प्रशासनाला कारवाई करत असताना संरक्षणासाठी मदत म्हणून पोलिसांना बोलावले जाते. काम करणारी यंत्रणाही शासकीय आहे आणि कारवाई करणारी यंत्रणाही शासकीय आहे, त्यामुळे शासनच शासनावर कशा प्रकार कारवाई करतंय? ही हास्यास्पद बाब आहे.
कुर्डू ग्रामपंचायत जे काम करत आहे, ते शासकीय नियमांत बसते की नाही, हे पाहण्याचे काम ग्रामसेवकाचे आहे. ते काम रीतसर टेंडर होऊन शासकीय नियमांमध्ये बसून मंजूर झालेले ते काम आहे. पण, त्याबाबत आता माहिती मिळाली की, त्याची मुदत संपलेली होती. पण, तो तांत्रिक मुद्दा आहे. मुदत संपल्यानंतर मुदतवाढीची तरतूद असते. त्याची प्रक्रिया ग्रामसेवक राबवितात, असेही पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, अतिवृष्टीमध्ये रस्ता वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी रस्ताच राहिला नाही, त्यामुळे सर्वच ग्रामपंचायती तत्काळ मुरमीकरणाचे काम करत असतात. सध्या सोलापूर जिल्ह्यात अशी कामं केली जात आहेत. या कामाचे तर टेंडर काढले होते. स्वतः ग्रामपंचायत काम करत आहे. म्हणजे स्वतः शासन काम करत आहे. शासनच शासनाला अवैध उत्खनन आहे, असे म्हणतंय का?
शासनाचा एक विभाग अवैध उत्खनन प्रकरणी दुसऱ्या विभागाला जबाबदार धरतंय आणि कारवाई मात्र ग्रामस्थांवर केली जाते. यात गावातील लोकांचा काय संबंध आहे. त्यांना काय माहिती आहे की, हे काम नियमानुसार आहे की अनाधिकृतपणे आहे. गावकऱ्यांना फक्त रस्त्याची मागणी आहे. ते करून घेण्याची ग्रामसेवकाची जबाबदारी आहे, ती केली जात नसेल तर ग्रामसेवकाला सस्पेंड करा ना, असेही उमेश पाटील यांनी सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.