Eknath Shinde Politic's : फडणवीस, अजितदादानंतर आता एकनाथ शिंदेही इलेक्शन मोडवर; होमग्राउंड साताऱ्यासाठी टाकणार नवा डाव

Local Body Election 2025 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुती व महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on
  1. महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू:
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

  2. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा दौरा महत्त्वाचा:
    देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यात येऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत.

  3. आरक्षण जाहीर झाल्याने उमेदवारांची लगबग:
    जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून पक्षीय उमेदवारीवर चाचपणी सुरू आहे.

Karad, 14 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह महाविकास आघाडीतीलही घटक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाचा नुकताच पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या पक्षाचा आढावा घेतला.

त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बुधवारी त्यांचे होमग्राऊंड असलेल्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सातारा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्याचे नेटके नियोजन केले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुका या पक्षीय पातळीवर स्वबळावर होणार की महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीद्वारे लढवल्या जाणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.

आपल्याच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्या तीनही पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचाही धडाका लावला आहे. त्याचबरोबर पक्षीय पातळीवर चाचपणीही सुरु केली आहे.

Eknath Shinde
Akkalkot Politic's : अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जून पाटील, शिवानंद पाटलांना धक्का; आनंद तानवडे, कल्याणशेट्टींच्या काकूंचा ZPचा मार्ग मोकळा!

नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीची आऱक्षण सोडतही झाली आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडे आरक्षणानुसार निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या इच्छुकांवर शिक्कामोर्तब अद्यापही झाले नसली तरी इच्छुकांनीही आता पायाला भिंगरी लावून फिरायला सुरूवात केली आहे.

सातारा जिल्हा परिषद, जिल्ह्यातील ११ पंचायत समित्या, नऊ नगरपालिकांसाठी जिल्ह्यातील सर्वच पक्षांची जोदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या (बुधवारी, ता. १५ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांचे होमग्राऊंड असलेल्या सातारा जिल्ह्यात येत आहेत.

सातारा दौऱ्यात ते जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यामध्ये ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीचीही चाचपणी करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात काय-काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Sangola Politic's : शहाजीबापूंच्या चिरंजीवाची ZP एन्ट्री हुकली; दीपक साळुंखेंचा मुलगा जवळ्यातून रिंगणात उतरणार, शेकापकडे लक्ष

1. कोणत्या पक्षांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे?
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

2. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे दौऱ्यावर जाणार आहेत?
ते त्यांच्या होमग्राऊंड सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

3. शिंदे यांच्या दौऱ्याचा उद्देश काय आहे?
शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी तपासणे हा उद्देश आहे.

4. आरक्षण सोडतीनंतर काय घडले आहे?
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी पक्षीय स्तरावर सक्रिय हालचाली सुरू केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com