Solapur, 20 October : सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षात कुरबुरी सुरू असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंडाचा झेंडा फडकावला आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटप होण्यापूर्वीच आडम मास्तरांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) असलेल्या माकपने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहे, त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आपल्याला सुटणार नाही, हे ओळखून माजी आमदार नरसय्या आडम यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.
माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यातून त्यांनी महाविकास आघाडीचे जगावाटप होण्याअगोदरच निवडणूक अर्ज भरण्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. येत्या 28 तारखेला माजी आमदार नरसय्या आडम हे हजारो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत माकपकडून अर्ज दाखल करणार आहेत.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या काँग्रेसच्या माजी आमदार प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला होता. त्या लोकसभा निवडणुकीत माकपने सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला होता. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत माकप अर्थात आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला होता.
सोलापूर शहर मध्यची जागा माकपला सुटावी, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. मात्र, जागा वाटपात सोलापूर शहर मध्यची जागा माकपला सुटण्याची शक्यता धूसर दिसत आहे, त्यामुळे नरसय्या आडम यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखच जाहीर करून टाकली आहे, त्यामुळे सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.