Dashrath Mane : पवारसाहेब नवी खोंडं आणा की हो...असली कशाला घेताय?; हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मानेंचा हल्लाबोल

NCP Sharad Pawar Party : आमच्याच तंबूत का घुसतोय हा बाबा. आम्ही घर बांधतोय, सजवतोय आणि ते आमच्या घरात घुसताहेत. नको ना बाबा असं करू. आम्ही त्या मामाला कंटाळलोय, म्हणून आम्ही XXX मारली, तर हे आमच्याच घरात शिरत आहेत.
Sharad Pawar-Harshvardhan Patil Dashrath Mane
Sharad Pawar-Harshvardhan Patil Dashrath ManeSarkarnama
Published on
Updated on

Indapur, 11 October : पवासाहेब तुम्ही आमचे विठ्ठल आहात. अजूनही आमचं ऐका. सुप्रियाताई तुम्हीही ऐका, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका. पन्नास आमदार सोडून गेले, त्या वेळी मी पन्नास नवीन आमदार निवडून आणले, असे पवारसाहेब तुम्हीच यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. मग साहेब नवी खोंडं आणा की हो...असली कशाला घेताय.? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूरमधील नेते दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला.

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार गटातील सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने (Dashrath Mane), पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी इंदापूरमध्ये परिवर्तन मेळावा घेतला. या मेळाव्यात आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने यांच्यापैकी एकजण अपक्ष निवडणूक लढवतील, अशी घोषणा करण्यात आली. त्या सभेत माने बोलत होते.

जर काय चुकीचं झालं, तर सर्वांत मोठी बंडखोरी ही इंदापूर तालुक्यात (Indapur) झाल्याशिवाय राहणार नाही. सांगली पॅटर्न नव्हे; तर सांगलीचा दहा पॅटर्न इंदापूरमध्ये बघायला मिळेल. कारण इंदापूर तालुक्यातील जनता आता चिडली आहे. ज्यावेळी जनता चिडते, तेव्ही ती कोणाचंही ऐकत नाही. इतिहास बदलायला आम्ही १९९५ मध्ये होतो. काय करायला पाहिजे, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही दशरथ माने यांनी दिला.

Sharad Pawar-Harshvardhan Patil Dashrath Mane
Indapur Politic's : आम्ही जेलमध्ये बसू; पण इंदापुरातून विधानसभा लढूच; पवारांच्या निकटवर्तीय नेत्याची घोषणा

पवासाहेब तुम्ही आमचे विठ्ठल आहात. अजूनही आमचं ऐका. सुप्रियाताई तुम्हीही ऐका, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका. त्यांना (हर्षवर्धन पाटील) मोदींच्या जागेवर नेऊन बसवा. त्यांना दिल्लीत न्या. विधान परिषदेवर घ्या. मंत्री करा, मुख्यमंत्री करा. पण, आम्हाला का त्रास देता, असा सवालही माने यांनी विचारला.

माने म्हणाले, आमच्याच तंबूत का घुसतोय हा बाबा. आम्ही घर बांधतोय, सजवतोय आणि ते आमच्या घरात घुसताहेत. नको ना बाबा असं करू. आम्ही त्या मामाला कंटाळलोय, म्हणून आम्ही XXX मारली, तर हे आमच्याच घरात शिरत आहेत. तुम्ही भाजपचं खाता. विकास आघाडीचं खाल्लं. शिवसेनेचंही खाल्लं. काँग्रेसचं तुम्ही ओरबडून खाल्लं. पुन्हा आमच्या ताट्यात का येता. आमचं आम्हाला खाऊ द्याना.

पन्नास आमदार सोडून गेले, त्या वेळी मी पन्नास नवीन आमदार निवडून आणले, असे पवारसाहेबांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. मग साहेब नवी खोंडं आणा की हो....असली कशाला घेताय.? किती वर्षांपासून घराणेशाही...? १९५२ पासून तोच पाटीलवाडा, त्यांची पोरं, त्यांची पोरगी. तुमची तीन आदमी पार्टी आमच्या घरात घुसली आहे, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला.

Sharad Pawar-Harshvardhan Patil Dashrath Mane
Shivsena UBT : नागपुरात ठाकरे सेनेच्या वाट्याला दोन जागा; उमेदवारही लागले कामाला

इंदापूर तालुक्यात उद्रेकाची परिस्थिती आहे, स्फोटक वातावरण आहे. इंदापूर तालुक्यात परिवर्तन करण्याचा निर्णय आता स्वाभिमानी जनतेने घेतला आहे, असेही माने यांनी म्हटले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com