

Solapur, 30 March : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे मोहित कंबोज यांच्या भेटीवर टीका करणारे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्यावर अमित ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला. कंबोज आणि राज ठाकरेंच्या भेटीवर जे टीका करतात, त्यांनी किती पक्ष बदलले..? अगोदर शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि मग भाजपमध्ये गेले. आपला बॉस कोण आहे, हे या लोकांनी ठरवलं पाहिजे, असा टोला नाव न घेता अमित ठाकरे यांनी राणेंना लगावला.
सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीवेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला हाता. त्या वेळी सरवदे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अमित ठाकरे हे सोलापुरात आले होते. त्यानंतर पुन्हा आज ते सरवदे कुटुंबाला भेटले, त्या वेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्यावर प्रत्युत्तर दिले.
अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले, मोहित कंबोज आणि राज ठाकरे हे खूप जुने मित्र आहेत. मोहित कंबोज हे अनेकवेळा राज ठाकरे यांना भेटायलाही येतात, त्यामुळे आपण राजकारण आणि मैत्री हे वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे याअगोदर होत होतं, जे आता आपण का बंद केलं आहे, हे मला माहिती नाही.
आपण एका भूमिकेला विरोध करतो, माणसाला विरोध करत नाही. आता राज ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्या भेटीला जे लोक विरोध करून बोलतायत, त्यांनी किती पक्ष बदलले..? ते अगोदर शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, त्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि मग भाजपमध्ये आले, असा टोला ठाकरेंनी लगावला.
त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे आणि आपला बॉस हा तात्पुरता आहे. वेगळ्यांची सत्ता आली की आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलतो, त्यामुळे या लोकांनी विचार केला पाहिजे, असा सल्लाही अमित ठाकरेंनी राणेंना दिला.
फक्त भगवा कुर्ता घालून कोणी हिंदू होतो, असं मला तरी वाटत नाही. हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं, अशी टीका अमित ठाकरेंनी नीतेश राणे यांचे नाव न घेता केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.