Ahmednagar News : महावितरणला जबर शॉक; तब्बल 4 कोटी रुपयांची वीजचोरी!

Mahavitaran Electricity News : महावितरणने टाकला छापा, 4 कोटींचा बसला झटका...
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील मोहरी रोडवरील वीजचोरी करणाऱ्या गायकवाड याच्या स्टोन क्रशरला वीज महावितरणच्या भरारी पथकाने तब्बल चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गायकवाड याचे बालाजी पेव्हिंग ब्लॉक, आराध्य क्रशर, बालाजी क्रशर अशा वेगवेगळ्या फर्मच्या नावाने एकाच ठिकाणी स्टोन क्रशर करून, वेगवेगळ्या आकाराची खडी, वाळू डस्टची निर्मिती केली जाते.

या फर्मवर महावितरणच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गायकवाड यांनी वेळेत दंड न भरल्यास संबंधित खडी क्रशरचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार असल्याची माहिती सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली. (Latest Marathi News)

Ahmednagar News
Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात एका माजी नगरसेवकासह दोघांना कोठडी; गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढणार ?

पाथर्डी शहराच्या दक्षिण बाजूला मोहरी रोडवर डोंगराच्या पायथ्याला अनेक खडी क्रशर सुरू आहेत. यामध्ये गायकवाड याचे खडी क्रशर असून सागर गायकवाड, विष्णू गायकवाड, सचिन गायकवाड, के. व्ही. गायकवाड अशा कुटुंबातील वेगवेगळ्या नावांनी फर्म आहेत. या फर्मसाठी चार वीज कनेक्शन घेण्यात आले आहेत. संबंधित खडी क्रशरवर वीजचोरी करून सुरू असल्याची गुप्त माहिती वीज महावितरणच्या भरारी पथकाला मिळाली. छापा घालून वीजचोरी पकडण्याचे वरिष्ठ पातळीवर नियोजन करण्यात आले. मुंबई, वाशी, नाशिक अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणावरून आलेल्या वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकांनी संयुक्त छापा घातला. स्थानिक अधिकाऱ्यांना या कारवाईची माहिती देण्यात आली नव्हती. अचानक घातलेल्या छाप्यात संपूर्ण क्रशर वीजचोरी करून सुरू असल्याचे पथकाच्या लक्षात आले.

Ahmednagar News
Lok Sabha Election 2024 : 'नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' येणार...'; राम शिंदे अन् लंकेंनी वाढवली सुजय विखेंची धडधड

वीज वितरण कंपनीच्या मीटरशेजारी थेट मीटर बंद करणारे स्वतंत्र उपकरण लावून वीजचोरी केली जात होती, तर इतर तीन मीटरमध्ये फेरफार करण्यात आला असल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत सिद्ध झाले. भरारी पथकाने केलेल्या दंडामध्ये, बालाजी स्टोन क्रशर नावाने असलेल्या मीटरला एक कोटी 84 लाख 38 हजार 499, आराध्या क्रशर या नावाने असलेल्या मीटरला एक कोटी 27 लाख 82 हजार दोनशे दहा रुपये, बालाजी पेव्हिंग ब्लॉक या नावाने असलेल्या या मीटरला 48 लाख 98 हजार 850, तर आणखी एका मीटरला 23 लाख 49 हजार 960 रुपये दंड करण्यात आला. गायकवाड यांच्या नावावर असलेल्या एकूण चार मीटरला एकूण तीन कोटी 84 लाख 69 हजार 519 रुपये दंड करण्यात आला.

वीजचोरीच्या दंडाची रक्कम वेळेत न भरल्यास वीज कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमितकुमार व सहायक संचालक साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सूर्यकांत पानतावणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्युत पवार, उपकार्यकारी अभियंता सुदर्शन कांबळे, सहायक अभियंता कपिल गाठले, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय कान्ह पाटील व विजय दिनकर पाटील सहभागी झाले होते.

(Edited by - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com