Ajit Pawar : आम्हाला ताकद द्या ! तडफदार नव्या शिलेदारांची थेट अजितदादांनाच साद

Satara NCP Ajit Pawar Fraction : जुन्या पदाधिकाऱ्यांचा साहेंबाना पाठिंबा, नव्या कारभाऱ्यांना पक्षवाढीचे आव्हान
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Satara Political News : राष्ट्रवादी काँग्रसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडले आणि पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर अजितदादांनी आपला पक्ष उभा करण्यासाठी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर नव्याने शिलेदारांच्या निवडी केल्या. दरम्यान, अजित पवारांची बारामती वगळता राज्यात मोठी सभा झाली नाही. यामुळे नव्या तडफदार पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे पक्षवाढीसाठी ताकद देण्याची मागणी केली जात आहे.

कराड येथील पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे ही मागणी केली. यावेळी नुकतीच नियुक्ती झालेले तालुका प्रमुख जितेंद्र डुबल आणि राजेश पाटील-वाठारकर यांनी तटकरेंची कराड विमानतळावर भेट घेतली.

या भेटीत प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघात अजित पवार गटाची ताकद वाढीसाठी पाठबळ देण्याची मागणी केली. या दोन्ही मतदारसंघात जुने-मूळची लोक शरद पवार गटात राहिलेले आहेत. मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गट बांधणीसाठी अजित पवार गटही सक्रिय झाला आहे.

Ajit Pawar
Vanchit : 'वंचित'ची नेमकी साथ कुणाला? कार्यक्रम नसल्याने कार्यकर्ते सैरभैर

राज्यात गेल्या तीन वर्षात राजकारणात पक्षफूटी, नेत्यांची पळवापळवी, पक्षप्रवेश, आमदार पात्र-अपात्र या राजकीय कुरघोड्या उघडपणे महाराष्ट्रातील जनतेला पाहिल्या. आता काही दिवसांवर लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्याची तयारी करण्यासाठी अजित पवार गट हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील निवडी केल्या आहेत. मात्र, आता ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्ता दिसला पाहिजे, तरच ताकद वाढणार आहे. यासाठी पदाधिकारी सभा, विकासकामे आणि कार्यकर्ते वाढविण्यासाठी कार्यक्रमांची मागणी करू लागले आहेत.

Ajit Pawar
Eknath Shinde Thane : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आगीशी खेळ, 26 लाख नागरिकांचे जीव धोक्यात!

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी (Ajit Pawar) 1999 ते 2004 कारभार पाहिला आहे. यावेळी शेवटच्या कार्यकर्त्यांशी नावासह थेट संपर्क होता. आता मूळचे होते ते शरद पवारांच्या गटात थांबले. यामध्ये प्रामुख्याने कराड उत्तर, दक्षिण, कोरेगाव, सातारा-जावळी आणि पाटण मतदारसंघातील जुने मातब्बर आजही शरद पवारांच्या मागे उभे आहेत. परिणामी नव्या कारभाऱ्यांना पक्ष वाढीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत. या ठिकाणी अजितदादांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी लक्ष घालून गटाला ताकद देण्याची गरज असल्याची कैफियत नव्या तालुकाप्रमुखांनी मांडली.

अजित पवारांचे सभा लवकरच

नव्या कारभाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे आपली अडचण मांडल्यानंतर काही सेंकदातच तटकरेंनी तुम्हांला दादांची सभा देवू का असे विचारले. त्यामुळे आता लवकरच सभा आणि दौरे सातारा जिल्ह्यासह राज्यात होतील, अशी आशा पदाधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.  

अजित पवार गटाचे नवे तालुका प्रमुख 

शिवाजीराव महाडिक (कोरेगाव), प्रमोद शिंदे (वाई), दत्तानाना ढमाळ (खंडाळा), नंदकुमार मोरे (खटाव), बाबुराव सपकाळ (महाबळेश्वर), जितेंद्र डुबल (कराड), जयकुमार इंगळे (फलटण), सागर पाटील (पाटण) यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Abdul Sattar : सत्तेसाठी सत्तार मंदिर अन् संत महंतांच्या दारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com