Ajit Pawar : महापालिका निवडणुकीत चालणार दादाचा वादा अन् भाजपचा होणार वांदा !

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काहीच महिन्यात लागण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांची घोषणा करून भाजपसह, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बुस्ट दिला आहे.
Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीमधील पालकमंत्री पदाच्या वाटाघाटींमध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राखण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे जिल्ह्यासह शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर पडू शकतो. जिल्ह्यात पालकमंत्री पदाचा एडव्हांटेज राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून भाजप बॅक फुटवर जाईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर असे भाजप नेते खाजगीत बोलून दाखवत आहेत.

दादांचा धबधबा तर भाजपची डोकेदुखी वाढणार

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुका महायुती म्हणून भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. मात्र पुणे जिल्हा परिषद आणि दोन्ही महापालिकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याची जास्त शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर मागील निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. अजित पवार पालकमंत्री असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांना या दोन्ही महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तर गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होतं. भाजपची ताकद कमी आहे पुणे ग्रामीणमध्ये दौंड मतदारसंघाच्या रूपाने केवळ एकमेव भाजपचा आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये देखील धबधबा ग्रामीण भागात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar : पालकमंत्रिपदाचा चेहरा दादा अन् कारभारी धनंजय मुंडे ? शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली चिंता व्यक्त

भाजप पुढे कार्यकर्त्यांना बळ देण्याची आव्हान

भाजपला ग्रामीण भागात पक्ष संघटन आणि जनाधार वाढावायच्या उद्देशाने पालकमंत्रीपद महत्त्वाचे होते. दोन्ही पालिकेत सत्ता टिकवण्यासाठी पालकमंत्री पदाचा फायदा झाला असता. गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्या पालकमंत्रीपदाच्या काळात भाजप कार्यकर्त्यांना फायदा झाला होता. पण आता गेल्या अडीच वर्षापासून अजित पवार पालकमंत्री होते. आता पुढच्या पाच वर्षे तेच पालकमंत्री राहणार असल्याने भाजपसमोर पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे मोठे आव्हान तयार झाले आहे.

पुण्याचा जिल्हा नियोजन समितीचा आराखडा तब्बल साडेबाराशे कोटींचा आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व विभागांच्या जिल्हा परिषदेबरोबरच पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, पोलीस आणि संबंधित इतर शासकीय खात्यांची बैठक घेण्याचे अधिकार पालकमंत्री यांना आहेत. त्यामुळे पालकमंत्रिपद ताब्यात घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यावर आपलेच वर्चस्व राहणार, असल्याचे ठासून सांगितले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. अशा वेळी जिल्हा नियोजन समितीतील विकासकामे, तसेच शहरातील विकास प्रकल्पांसाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. निधीवाटप करताना महायुतीमध्ये पालकमंत्री म्हणून अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षाला अधिक निधी पदरात पाडून घेतात.

Ajit Pawar & Devendra Fadanvis
Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेक्स्ट टार्गेट; 'स्थानिक'मध्ये सर्वाधिक महापालिका जिंकायच्या अन् 'शहरी' चेहरा

निधी वाटपावरून महायुतीमधील कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहिला मिळाले. त्यामुळे येत्या पाच वर्षांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवाटपाचे धोरण महायुतीमध्ये कसे आखणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र धास्तावाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com