Vijayraj Dongre : अजित पवारांचा शेटफळ दौरा रद्द; राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विजयराज डोंगरेंचे मौन

Ajit Pawar Mohol Tour Cancelled : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोहोळ दौरा रद्द झाल्याने भाजप नेते विजयराज डोंगरे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला पुन्हा विलंब झाला आहे. डोंगरेंच्या मौनामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Ajit Pawar-Vijayraj Dongre
Ajit Pawar-Vijayraj DongreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या (ता. 14 जानेवारी) होणारा मोहोळ तालुक्यातील शेटफळ दौरा रद्द झाला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा भाजप नेते विजयराज डोंगरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश पुन्हा लांबणीवर पडला आहे. मात्र, तो कधी होणार, याबाबत खुद्द डोंगरे यांनी मौन बाळगले आहे, त्यामुळे डोंगरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे (Vijayraj Dongre) यांचा उद्या (ता. 14 जानेवारी) शेटफळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळही दिला होता. पवार यांचा दौरा आज (मंगळवार ता. 13 जानेवारी) दुपार चारपर्यंत निश्चित होता. मात्र, चारनंतर उपमुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला आहे, त्यामुळे डोंगरे गटात चलबिचल निर्माण झाली आहे.

सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषदेची निवडणूक आज जाहीर झाली आहे. झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत डोंगरेंचा प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न होता. मात्र, पवारांचा दौरा रद्द झाल्याने विजयराज डोंगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ajit Pawar-Vijayraj Dongre
Solapur ZP : झेडपी निवडणुकीची घोषणा होताच भाजप लागला कामाला; पालकमंत्री गोरेच प्रभारी?,पहिल्याच दिवशी उचलले ‘हे’ पाऊल...

माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळमध्ये कमकुमवत बनला आहे, जिल्हा परिषदेसाठी विजयराज डोंगरे यांच्यासारखा मातब्बर नेता पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या. पण, आज अजितदादांचा दौराच रद्द झाल्याने डोंगरेंचा राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर पडल्याचे मानले जात आहे. पवारांचा दौरा कोणत्या कारणासाठी रद्द झाला हे मात्र समजू शकले नाही.

Ajit Pawar-Vijayraj Dongre
Ajit Pawar News : मतदानाआधी अजित पवारांना मोठा धक्का; राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर पोलिसांची धाड...

प्रवेश कधी होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत माजी सभापती विजयराज डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या (ता. 14 जानेवारी) होणारा शेटफळ दौरा रद्द झाल्याचे सांगितले. तसेच, प्रवेश कधी होणार, याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com