
Pandharpur, 30 May : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निधी वळविल्याच्या कारणावरून टीका केली जात आहे. सुरुवातीला शिवसेनेचे मंंत्री संजय शिरसाट, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उघडपणे अजितदादांवर हल्ला चढविला. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनीही गुरुवारी (ता. २९ मे) हल्लाबोल केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज (ता. ३० मे) पुन्हा अजित पवारांवर बरसले आहेत. अजितदादांना अर्थमंत्रिपद का पाहिजे? त्यांना अर्थशास्त्राचा एखादा फॉर्म्युला कळतो का? ‘अजितदादा पवार हा पोल्ट्री चालवणारा माणूस. पण, काकांच्या जिवावार राजकारणात आले,’ अशी टीका हाकेंनी केली आहे.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, आमची ‘पीएच.डी.’ची पोरं अजितदादा पवारांकडे खेटं घालून घालून दमली आहेत. ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयांचा निधी हेच अजितदादा पवार देतात. त्यांना दिलाच पाहिजे, अजून दहा हजार कोटी द्या. पण, तेच अजितदादा ओबीसींच्या महामंडळाला दोन पाच कोटी रुपये देऊ शकत नाहीत का? अजितदादा पवारांना का पाहिजे अर्थमंत्रिपद? कायम तेच अर्थमंत्री का? अजितदादा पवारांची अर्थशास्त्रात काय पीएच.डी. झाली आहे का? अजितदादांना अर्थशास्त्राचा एखादा फॉर्म्युला कळतो का?
अजित पवार (Ajit Pawar) आणि सामाजिक न्याय यांचा काहीही संबंध नाही. अजितदादा पवार हे पोल्ट्री चालवणारे माणूस आहेत. काकाच्या जिवावार राजकारणात आले. सामाजिकदृष्ट्या मागास लोकांच्या बाबत त्यांनी प्रचंड अन्याय लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाल्यावर त्यांनी त्याबाबत सावरासावर केलेली आहे., असा दावा हाके यांनी केला.
ते म्हणाले, एससी आणि एसटी समाजाचा ७४६ कोटी रुपयांचा निधी या माणसाने (अजित पवार) दुसरीकडे वळविला आहे. खूप टीका होऊ लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर खुलासा केला आहे. निधी वळविल्यामुळे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट हेही नाराज झाले आहेत.
अजित पवार यांच्यामुळे सत्तेचे गणित मोडू शकतं का? या प्रश्नावर उत्तर देताना हाके म्हणाले, आमचं एकच म्हणणं आहे की, पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला, असे चित्र उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसू शकते, असेही लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केले.
निधी वाटपाच्या असंतोषामुळे सरकार कोसळेल का, यावर हाके यांनी वेगळाच तर्क मांडला. मुळात सरकारमध्येच सगळे आहेत. मी जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रात आता विरोधकच उरलेला नाही. सगळे मुख्य नेते हे भाजपमध्ये आहेत. काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सगळे भाजपला सामील झालेले आहेत. पण दुर्दैव हे आहे की, गावगाड्यातील सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला माणूस आहे, जो आवाज उठवू शकत नाही, जो राजकीय उपद्रव मूल्य दाखवू शकत नाही, त्या माणसांचं सध्या मरण आहे, अशी खंतही हाके यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.