
Satara, 04 May : पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला मोकळीक दिलेली आहे. आज अजितदादा इथे हवे होते. त्यांनी वित्तीय भार आम्हाला वित्त विभागाकडून जरा अधिक हलका करून दिला असता तर आपल्याला दरवर्षी एकाऐवजी दोन महोत्सव आयोजित करता आले असते. पण, हरकत नाही. अजितदादांकडे आम्ही मकरंदआबा पाटील यांना घेऊन जाऊ. मकरंद आबांना घेऊन गेल्यावर फारशी अडचण येणार नाही, अशा शब्दांत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गैरहजेरीबाबत भाष्य केले.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्याचे उद्घाटन केले होते, तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप झाला. समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना शंभूराज यांनी अजितदादांच्या अनुपस्थितीत न कळत नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, पर्यटन महोत्सवाचा हा पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे यशस्वी होईल की नाही, असा मनात विचार येत होता. पर्यटन महोत्सवाचा कार्यक्रम यशस्वी झाला, तर पाठीवर थाप टाकणाऱ्यांची संख्या कमी असते. अयशस्वी झाला तर काय केलं शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai), कोण सांगितलं होतं करायला, असं बोललं गेलं असतं. त्यामुळे भीत भीतच मी तीन दिवसांचा महोत्सव आयोजित केला होता.
एकनाथ शिंदेंनी मला विचारलं, महोत्सव तीन दिवसांचा का आयोजित केला. मी म्हटलं, साहेब भीत भीतच केला. पण, आता अंदाज आला आहे. यापुढे चांगल्या पद्धतीने पर्यटन विभागाचा महोत्सव राज्याच्या सर्व विभागात चांगल्या पद्धतीने करण्यात येईल. या विभागाचा मंत्री म्हणून आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते ठरवलं आहे. या विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक या महोत्सवासाठी पुण्यापर्यंत आले होते. पण, महत्वाचं काम आल्याने त्यांना माघारी जावं लागलं. राज्याच्या पाचही महसुली विभागात पाच पर्यटन महोत्सव दरवर्षी घ्यायचे. त्यात विभागातील पर्यटन स्थळं, खाद्य संस्कृतीचं ब्रॅडिंग करण्याचे काम केले जाणार आहे, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
शंभूराज यांनी सांगितले की, आपण दरवर्षी दोन पर्यटन महोत्सव केले, तर यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमध्ये वॉटर स्पोटर्स ॲक्टिव्हिटी करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ते पहिल्यांदा मुनावळेमध्ये आपण सुरू केलं आहे. मुनावळे हे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघात येतो. या फेस्टिव्हला सुमारे ७५ हजार लोकांनी भेट दिली आहे. वेण्णा लेकमध्ये आपण लेझर शो ठेवला होता. तो कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची स्थानिकाची मागणी आहे. त्याबाबत आपण विचार करू शकतो.
महाबळेश्वर,पाचगणी, तपोळा या भागाचे टुरिस्ट ब्रॅडिंग करण्यासाठी या महोत्सवाची मोठी मदत आम्हाला झाली आहे. पर्यटन महोत्सवासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सहकार्य आगामी काळातही मिळावं, अशी अपेक्षाही पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.