Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : चित्रपट महामंडळातील राजकारण पेटले; संचालकांमधील दुफळीने लांबली निवडणूक

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal: अखिल भारतीय चित्रपट मराठी महामंडळाचा विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपून साडेतीन वर्षे उलटली तरी अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
Akhil Bhartiya Marathi Chitrapat MahamandalSarkarnama
Published on
Updated on

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय चित्रपट मराठी महामंडळाचा विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपून साडेतीन वर्षे उलटली तरी अद्याप निवडणुकीची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी संचालकांमधील आणि सत्ताधारी विरोधात यांच्यामधील वाढलेला टोकाचा वाद, वाढलेला विरोध त्यामुळे चित्रपट महामंडळातील विरोध टोकाला गेला आहे. सध्या धर्मादाय आयुक्तांकडे कार्यभार असला तरी खर्चाबाबत सर्वच परवानगी मिळत असल्याने संचालकांमधील वाद सातत्याने धुमसत आहे.

अशातच निवडणुकीचा वाद कोर्टात गेल्याने निवडणुकीची प्रतीक्षा आहे. चित्रपट महामंडळाच्या कार्यकारणीची बैठक येत्या 15 जानेवारीला होणार असून महामंडळाचा तमाशा आता तरी थांबणार का याकडे लक्ष आहे. कारण या बैठकीनंतरच निवडणुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
Amit Shah Politics: ‘ व्होट जिहाद’च्या दिल्लीवारीला सुरतने लावला सुरूंग अन् गृहमंत्र्यांची मालेगावकडे पाठ!

कोल्हापुरातील चित्र नगरीने पुन्हा एकदा कात टाकल्यानंतर चित्रीकरणाचा व्यवसाय वाढला आहे. मराठी चित्रपटाचे कार्यालय कोल्हापुरातच (Kolhapur) असल्याने सर्वांच्या नजरा आता पंचवार्षिक निवडणुकीकडे लागले आहेत. मात्र जुन्या आणि नवा मतदारांच्या घोळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष उफाळला आहे. अनेकदा वार्षिक सभेत ही संचालकांचा वाद चव्हाट्यावर आल्याने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे.

2016 च्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर चित्रपट क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांना अ वर्गाचे सभासद देण्यात आले. ही संख्या तीस ते पस्तीस हजारांच्या घरात आहे. मात्र तीन वर्षे झालेल्या सभासदांना मतदान करण्याचा अधिकार पात्र होतो. यानंतर कार्यकारणीची मान्यतेने सभासद मतदानास पात्र होतो. मात्र अशा मतदारांना मतदानाचा अधिकार देऊ नये यासाठी अनेक संचालकांसह सभासदांचा विरोध राहिला आहे.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal
Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला जोरदार झटका; आघाडीतून बाहेर पडण्यासाठी टाकलं पहिलं पाऊल?

त्याबाबतची याचिका एका पदाधिकार्‍याने हायकोर्टात दाखल केली. तर नव्याने सभासद झालेल्यांनी मतदानास पात्र व्हावे म्हणून यासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने निवडणूक रखडली आहे. येणाऱ्या 15 जानेवारी रोजी संचालकांमध्ये बैठक होणार असून या दोन्हीही याचिका माघार घेण्याची चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र याचिका पहिल्यांदा माघार कोण होणार यावर वाद आहे. येत्या 15 जानेवारी रोजी यावर मार्ग निघाला तरच चित्रपट महामंडळाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com