Ajitdada Vs Mahesh Landge : अजितदादासुद्धा चुकलेत, त्यांनी नको त्यांना मोठं केलं : लांडगेंच्या एकेरी उल्लेखानंतर कट्टर समर्थकाने व्यक्त केली परखड भावना

Vilas Lande Big Statement : माजी आमदार विलास लांडे यांनी महेश लांडगे आणि अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका करत चुकीच्या कार्यकर्त्यांना मोठे केल्याने ते भाजपमध्ये गेले, अशी नाराजी व्यक्त केली.
Vilas Lande -Mahesh Landge-Ajit Pawar
Vilas Lande -Mahesh Landge-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri chinchwad, 11 January : ज्यांनी संधी दिली, तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्याविषयी एकेरी बोलणं, हे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पटलेले नाही. महेश लांडगेंचे राजकीय वस्ताद हे अजितदादा हेच होते. दुसरं कोणी नाही. अजितदादांना तेव्हाही सांगत होतो, त्यांना (महेश लांडगे) पद देऊ नका. पण अजितदादासुद्धा कधी कधी चुकले आहेत, हे मी मान्य करतो. कोणाला मोठं करावं, हे आता अजितदादांनी लक्षात ठेवावं. त्यांनी नको ते कार्यकर्ते मोठे केले आणि ते भाजपमध्ये गेले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत, माजी आमदार विलास लांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. त्यावरून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. त्याबाबत बोलताना माजी आमदार लांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी १९९२ पासून २०१७ पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक लोकांना घडवलं आहे. हे सगळे त्याच बोटीतील आहेत, कोणी वेगळ्या बोटीतील नाहीत. आता ती नाव वेगळ्या ठिकाणी गेली. पण, शरद पवार आणि अजित पवार यांच्या माध्यमातूनच पिंपरी चिंचवड हे शहर घडलेलं आहे.

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शरद पवार हे होते, तर सेक्रेटरी हे बाळासाहेब लांडगे होते. म्हणजे जगाच्या नकाशावर पिंपरी चिंचवडमधील बाळासाहेब लांडगे यांना घेऊन पवारांनी काम केलेले आहे. ही पवारांची संस्कृती आहे, असेही लांडे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, महेश लांडगेंचे राजकीय वस्ताद हे त्या काळातील अजितदादा हेच होते. दुसरं कोण होतं मग? काम करताना त्या समाजाच्या मनाला ठेच लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अजितदादांना तेव्हाही सांगत होतो, त्यांना (महेश लांडगे) पद देऊ नका. पण अजितदादा हे सुद्धा कधी कधी चुकले आहेत, हे मी मान्य करतो.

महेश लांडगे हे अजितदादांना चिल्लर समजतात का? या खोलात मी जाणार नाही. पवारांविषयी किती वाईट बोलावं, याविषयी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. ज्या व्यासपीठावरून महेश लांगडे बोलले, त्या व्यासपीठाची पायाभरणी कोणी केली, हे तरी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अजित पवारांना एकेरी बोलणं हे या शहरातील लोकांना पटलेलं नाही. सकाळी सहापासून महापौर, आयुक्तांना घेऊन काम करणारे अजित पवार सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबत का बोलावं, हे आम्हाला पटलेलं नाही, अशी खंतही लांडे यांनी बोलून दाखवली.

महेश लांडगे हे कुणाच्या आदेशाने बोलतात हे सोळा तारखेनंतर समजेल. अजितदादांचे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत ना? ज्येष्ठ नेते शरद पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. पवारसाहेब हे काय गप्प बसणार आहेत का? असे सूचक विधानही लांडे यांनी केले.

Vilas Lande -Mahesh Landge-Ajit Pawar
Kolhapur civic polls : मी मरेपर्यंत माझ्यासमोर काँग्रेस लिहिले असेल; सतेज पाटलांनी महाडिकांना डिवचले

ते म्हणाले, आम्ही राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निष्ठा ठेवली आहे. ती आमची चूक आहे. कोणाला मोठं करावं, हे आता अजित पवारांनी लक्षात ठेवावं. त्यांनी नको ते कार्यकर्ते मोठे केले आणि ते भाजपमध्ये गेले आहेत.

पवारांनी लक्ष घातले आणि इंडस्ट्री वाढली

पिंपरी चिंचवडमध्ये ९० टक्के लोक हे बाहेरचे आहेत. या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करतो. शरद पवारांनी चाकण, पिंपरी चिंचवड, रांजणगावमध्ये एमआयडीसी होण्यासाठी लक्ष घातलं नसतं तर आम्हाला किती यश आलं असतं. हिंजवडीत संत तुकाराम कारखान्याचे भूमिपूजन केल्यानंतरही त्यांनी या ठिकाणी कारखाना उभारायचा नाही तर आपल्याला आयटी क्षेत्र आणायचे असल्याचे सांगितले हेाते. याठिकाणी किती लोकांना रोजगार मिळाला, स्थानिकांना जमिनीचे किती पैसे मिळाले, असा सवाल विलास लांडेंनी लांडगेंना केला.

Vilas Lande -Mahesh Landge-Ajit Pawar
BMC Election : लाडक्या बहिणी होणार लखपती; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले मोठे आश्वासन, सांगितला 5 लाखांचा प्लॅन...

महेश लांडगेंना सत्तेचा अहंकार : अजित गव्हाणे

ज्या नेत्याने आपल्याला घडवलं, त्यांच्याविषयी आपण एकेरी बोलणं, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही. सत्तेमुळे त्यांना अहंकार झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये परिवर्तन होणार आहे, हे लक्षात आल्यामुळे ते असे बोलत असतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com