Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाहांची प्रकृती बिघडली; कर्नाटक-महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रकृती खालावल्याने कर्नाटक-महाराष्ट्र दौरा अर्धवट सोडल्याची माहिती आहे. हुबळीहून ते तातडीने दिल्लीला रवाना झाले.
Amit Shah Resignation Demand
Amit Shah Resignation DemandSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र दौऱ्याबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. प्रकृती खालावल्याने अमित शाह यांनी आपला दौरा अर्धवट सोडल्याची माहिती आहे. हुबळी येथून ते तातडीने दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाह यांचा दोन दिवसांचा कर्नाटक-महाराष्ट्र दौरा नियोजित होता. शनिवारी कर्नाटकातील हुबळी आणि एकसंबा येथे त्यांच्या प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते.

एकसंबातील कार्यक्रमही रद्द?

अमित शाह यांचा कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोड़ी तालुक्यातील एकसंबा येथे कार्यक्रम होणार होता. येथे बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित होता. या कार्यक्रमासाठी मोठी तयारी करण्यात आली होती.

Amit Shah Resignation Demand
BJP News : जिल्हाध्यक्षाची खुर्ची अन् आमदारकीची संधी; मराठवाड्यात सात जणांना लागली लॉटरी...

रविवारी कोल्हापुरातही कार्यक्रम

अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या कल्लाप्पाणा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते. या कार्यक्रमालाही शाह उपस्थित राहणार होते.

Amit Shah Resignation Demand
Babasaheb Patil : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांसह आठ संचालकांना RBI चा दणका! नियमांचे उल्लंघन केल्याने संचालकपदावरून बडतर्फ

अमित शाह यांचा कर्नाटक आणि महाराष्ट्र दौरा राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी दौरा रद्द केल्याने हा कार्यक्रमही त्यांच्या अनुपस्थितीत होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत नेमकी काय समस्या निर्माण झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com