अण्णा हजारे तंदुरुस्त : सर्व तपासण्या करून राळेगणसिद्धीत दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते.
Anna Hajare
Anna HajareSarkarnama
Published on
Updated on

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल (ता. 25) नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियावरून अण्णा हजारे यांच्या तब्बेती विषयी अफवा पसरल्या जात होत्या. हजारे यांच्या निकटवर्तीयांनी अण्णा ठणठणीत असल्याचे सांगितले होते. Anna Hazare Fit: After all the tests, Ralegan Siddhi came

वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा हजारे पूर्णपणे तंदुरुस्त असून त्यांच्या सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याची माहिती हजारे यांचे स्वीय सहाय्यक संजय पठाडे यांनी सरकारनामाशी बोलताना दिली. हजारे हे सायंकाळी 4 वाजता राळेगणसिद्धी येथे दाखल झाले.

Anna Hajare
अजित पवार आले म्हणून अण्णा हजारे कार्यक्रमाला गेलेच नाहीत...

हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या.

दरम्यान सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले आल्याने डॉक्टरांनी हजारे यांना राळेगणलासिद्धीला जाण्यास परवानगी दिली. अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे हे दोन्ही दिवस अण्णांच्या समवेत होते.

Anna Hajare
अण्णा हजारे यांच्या दबावतंत्राला आले यश

दरम्यान, अण्णा रुग्णालयात दाखल झाल्यापासून राळेगणसिद्धीतील हजारे यांच्या कार्यालयात त्यांच्या तब्येतीची चौकशी सर्वच स्तरांतून केली जात होती. सरपंच लाभेष औटी, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त डॉ. गणेश पोटे, सुरेश पठारे, दादा पठारे, संपत पोटे, माजी सरपंच विलास पोटे, प्राचार्य दिलीप देशमुख आदींनी अण्णांची भेट घेत तब्येतीची चौकशी केली.

Anna Hajare
अण्णा हजारे म्हणाले, हा विजय विरोधकांचा नसून शेतकऱ्यांचा...

अण्णा हजारे रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या माध्यमातून पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली.

- संजय पठाडे, अण्णा हजारे यांचे स्वीय सहाय्यक

पुढील काही दिवस अण्णांना संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान पुढील एक आठवडा कार्यकर्त्यांनी भेटण्याचा आग्रह धरू नये. अण्णांची तब्येत अत्यंत चांगली आहे त्यामुळे त्यांची कुणीही काळजी करू नये.

- लाभेष औटी, सरपंच, राळेगणसिद्धी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com