राज्यात आणखी एक शिवसैनिकाची आत्महत्या

शिवसेनेची ( Shivsena ) राज्यात सत्ता आहे.
Shivsena
Shivsena Sarkarnama

अहमदनगर - शिवसेनेची ( Shivsena ) राज्यात सत्ता आहे. असे असले तरी अडीच महिन्यांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात एका शिवसैनिकाला आत्महत्या करण्याची वेळ आली तर दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात एका शिवसैनिकाने आत्महत्या केली आहे. ( Another Shiv Sainik commits suicide in the state )

नगर तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्याची गळफास घेवून आत्महत्या नगर तालुक्यातील शिरढोण येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सुदाम रामदास वाघ (वय 45) यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Shivsena
"शिवसेना पाठीत वार करत नाही" : क्षीरसागरांनी दिला काँग्रेसला दिलासा

शिरढोण (ता. नगर) शिवारात अंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह शुक्रवारी (ता. 25) सकाळी निदर्शनास आला. तो सुदाम रामदास वाघ (वय 45) यांचा असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वाघ यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याबाबतची माहिती अद्याप समजली नाही, याविषयी अधिक तपास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी दिली. मयत सुदाम वाघ हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे.

याच वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरवातीला उस्मानाबाद जिल्ह्यातील दत्तात्रेय नारायण वराडे ( वय 65 ) या शिवसैनिकाने आत्महत्या केली होती. त्यांनीही गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com