Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसींना तौफिक शेख टाळी देणार का?

Solapur City Central Constituency: फारूक शाब्दी यांना सोडून जे उमेदवार उभे आहेत, त्यांना आव्हान करतो तुम्ही स्पीड ब्रेकर बनू नका, तुम्ही आमच्या सोबत या.
Asaduddin Owaisi-Taufiq Shaikh
Asaduddin Owaisi-Taufiq ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 November : फारूक शाब्दी यांना सोडून जे उमेदवार उभे आहेत, त्यांना आव्हान करतो तुम्ही स्पीड ब्रेकर बनू नका, तुम्ही आमच्या सोबत या. आम्ही तुम्हाला छतीला लावून मागच्या सर्व गोष्टी विसरून जाऊ, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अपक्ष उमेदवार तौफिक शेख यांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले. आता खुद्द ओवैसी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने तौफिक टाळी देणार का, असा सवाल चर्चिला जात आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शहराध्यक्ष फारुक शाब्दी हे एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या सभेत ओवैसी बोलत होते. त्या वेळी त्यांनी माजी नगरसेवक तौफिक शेख यांना पुन्हा एमआयएमसोबत येण्याचे जाहीर सभेतून आवाहन केले. त्याला तौफिक शेख कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल.

तौफिक शेख हे सोलापूर शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवित आहेत. त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. माघार घेण्यासाठी ते निवडणूक कार्यालयातही पोचले होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता आला नाही.

Asaduddin Owaisi-Taufiq Shaikh
Asaduddin Owaisi : ...अन् ओवैसींना सभा सुरू असतानाच सोलापूर पोलिसांनी स्टेजवरच दिली नोटीस!

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून २०१४ मध्ये तौफिक शेख यांनी एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जोरदार टक्कर दिली होती. प्रणिती शिंदे यांना 46 हजार 907 मते पडली होती, तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे एमआयएमचे तौफिक शेख यांना तब्बल 37 हजार 138 मते मिळाली होती. त्या निवडणुकीत तौफिक शेख यांना अवघ्या 9 हजार 769 मतांनी पराभूत व्हावे लागले होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी नगरसेवक तौफिक शेख आणि त्यांचे बंंधू माजी महापौर आरिफ शेख यांच्यासह १४ माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर शेख यांनी शरद पवार यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ते महाविकास आघाडीकडून तौफिक शेख हे इच्छूक होते. मात्र ही जागा काँग्रेसला सुटली असून काँग्रेसकडून चेतन नरोटे यांनी उमेदवारी दिली आहे.

Asaduddin Owaisi-Taufiq Shaikh
Solapur Politic's : ठाकरेंनी जाहीररित्या कानपिचक्या देऊन प्रणिती शिंदे शिवसेनेच्या प्रचारापासून लांबच...

असदुद्दीन ओवैसी यांनी तौफिक शेख यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. मात्र, मागील काही घटना पाहता तौफिक शेख हे ओवैसे यांना मदत करणार का?, असा सवाल आहे. कारण, अडचणीत काळात ओवैसी आणि एमआयएमने आपल्याला वाऱ्यावर सोडले होते, अशी तौफिक शेख यांची धारणा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com