ashok kharat case : नवा ट्विस्ट! तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट; “CM पर्यंत पुरावे पोहोचवणारी टीम आमचीच”

Trupti Desai Vs Rupali Patil : भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी खरात याचा भांडाफोड आपणच केल्याचे म्हटले.
ashok kharat case; tripti desai rupali patil
ashok kharat case; tripti desai rupali patilsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अशोक खरात प्रकरणात SIT कडून सखोल तपास सुरू असून नवे खुलासे होत आहेत.

  2. तृप्ती देसाई आणि रुपाली पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपामुळे वाद चिघळला आहे.

  3. तृप्ती देसाईंनी फडणवीस यांना पुरावे दिल्याचा दावा केला आहे.

Pune News : भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. नाशिकमध्ये एसआयटीमार्फत अशोक खरात आणि इतरांची सखोल चौकशी सुरू असून, लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात नवीन-नवीन खुलासे होत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. दरम्यान या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या तृप्ती देसाईंवरच आता अशोक खरातशी आर्थिक व्यवहार करून त्याला अभय दिल्याचा आरोप झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तृप्ती देसाईंची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्यानंतर तृप्ती देसाई यांनी जोरदार पलटवार करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, खरात याचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुरावे दिल्याचा दावा केला आहे. यामुळे आता तृप्ती देसाई आणि रुपाली पाटील यांच्यातील वाद आणखी पेटला असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये गाजत असलेले लैंगिक शोषण व आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला अटक करण्यात आली असून आता हे प्रकरण नव्या आणि वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. एकीकडे विशेष तपास पथकाकडून (SIT) खरात याची तपासणी केली जात असतानाच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तर याच प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यात वार-पलटवार होताना दिसत आहे.

एकीकडे या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेली आहे. या प्रकरणामुळे राजकारणही चांगलेच तापले असतानाच आता तृप्ती देसाई यांनी त्यांच्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ आधीपासूनच उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. आता याच दाव्यावरून रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देसाई यांना घेरलं असून निशाना साधला आहे. त्यांनी, देसाई यांनी हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याऐवजी खरात यांच्या पत्नी आणि राज्य महिला आयोगाच्या (माजी) अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा गंभीर केला आहे.

यावर आता तृप्ती देसाई यांनी देखील उत्तर दिलं आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, मागील वर्षी एका वृत्तपत्राला मार्चमध्ये ही बातमी मिळाली त्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला होता. मात्र त्यावेळेस या व्हिडिओचे पेन ड्राईव्ह उपलब्ध नव्हते आणि बातमी प्रसिद्ध झाल्याने ते पेन ड्राईव्ह माझ्यापर्यंत पोहोचण्यास काही अडचणी निर्माण झाल्या.

मात्र 5 मार्चला ते व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचले त्यातील व्हिडिओ मी पाहिलेत जे अत्यंत आक्षेपार्य आणि गंभीर होते. याच दरम्यान कॅप्टन खरात हा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. यामुळे याबाबत मी पत्रकार परिषद घेणं टाळलं आणि काही पोलिसांच्या माध्यमातून ते पेन ड्राईव्ह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.

मुख्यमंत्र्यांपर्यंत जी माहिती पोहोचवली जात होती त्या टीमचाच आपण एक भाग होतो. माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्यावर कारवाई केली आहे. आता ज्या राजकारणी माझ्यावर आरोप करतायेत त्यांना बाईट देण्याचं आणि आंदोलन करण्याचं जी संधी मिळाली त्याचं श्रेय जातं. ही लोक पेन ड्राईव्ह घेऊन माझ्यापर्यंत आली होती त्यांना पोलिसांपर्यंत नेण्याचं काम मी केला आहे.

त्यामुळे खरात या सोबत सेटलमेंट करण्यापर्यंत नीच पातळीला मी उतरणार नाही. राजकारणी लोकांकडं हे लोक जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते पीडित माझ्याकडे आले आणि त्यामुळेच संबंधित राजकारणी महिलेच्या पोटात दुखत असल्याची टीका तृप्ती देसाई यांनी रूपाली पाटील यांच्यावर केलीय.

FAQs :

1. अशोक खरात प्रकरणात काय सुरू आहे?
SIT कडून सखोल तपास सुरू असून नवीन खुलासे समोर येत आहेत.

2. या प्रकरणात कोणत्या नेत्यांमध्ये वाद आहे?
तृप्ती देसाई आणि रुपाली पाटील यांच्यात वाद सुरू आहे.

3. तृप्ती देसाईंवर कोणते आरोप आहेत?
अशोक खरातशी आर्थिक व्यवहार करून त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

4. तृप्ती देसाईंनी काय दावा केला आहे?
त्यांनी फडणवीस यांना पुरावे दिल्याचे सांगितले आहे.

5. पुढे काय होऊ शकते?
SIT तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com