Kolhapur News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राधानगरीत सभा घेऊन आमदार प्रकाश अबिटकरांवर हल्लाबोल केला होता. मात्र आमदार प्रकाश आबिटकर यांनी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच सणसणीत प्रत्युत्तर दिले.
ठाकरे यांनी अदानीला पाणी विकणार म्हणून अत्यंत खोटा आरोप करत आहेत. "कोणाचा बाप आला, तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही", अशा शब्दात आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुनावले.
"माजी आमदार के. पी. पाटील नेमक्या कोणत्या पक्षात हे पहिल्यांदा बघावे लागेल. ते रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी चूळ भरायला दुसऱ्या पक्षात जातात, त्यांनी निष्ठेचे तत्त्वज्ञान आम्हाला शिकवू नये. त्यांच्यात सहकाऱ्यांना फसवणारे के. पी. साहेब हे ढोंगी व विश्वासघातकी आहेत", असा टोला आबिटकर यांनी लगावला.
शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, "आम्हाला चिंधीचोरपणा करण्याची गरज नाही. या जनतेने दोन वेळा आमदार करून जे प्रेम दिले, त्या प्रेमाचा उतराई म्हणून या मतदारसंघात अनेक प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहेत". आपल्या कार्यकाळात नागणवाडी, सर्फनाला, निष्णप, मेघोली, झापाचीवाडी, वासनोली या प्रकल्पांचे पूजन करून पाणी आणण्यात आले आहे. धामणीचे पाणीपूजन लवकरच होईल, असा विश्वास देखील आबिटकर यांनी व्यक्त केला.
या मतदारसंघातील बसूदेव भुजाईच्या निमित्ताने 4 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आपण आणणार आहोत. मतदारसंघातील प्रत्येक डोंगर हा हिरवागार करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
"राधानगरी विधानसभा मतदारसंघातील नागरिक गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाहीत. मागच्या काळात जे काही ग्रहण लागलं त्याबद्दल मी केपी पाटील तुमची माफी मागतो. आमदार तुम्ही केलं, पण तुमच्या पाठीत खंजीर खुपासला, जनतेच्या पाठीवर वार सुरू केले. आणखी काय द्यायचं होतं? मानसन्मान, प्रेम, आपुलकी सर्व काही दिले? पण शिवसेना नावाच्या आईचा घात केला. तुमच्या मनातील राग गेल्या अडीच वर्षापासून धगधगत ठेवला होता .यावेळी सरकारला आपण जाळून भस्म करतोय, ही वाट महाराष्ट्राची जनता पाहते. मी देखील आख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो, पण गद्दारी आणि हरामखोरी माझ्या रक्तात नाही. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्या अवलादीतील नाही. राधानगरीतील पाणी आदनीला विकले जाते, आम्ही शंड आहेत, म्हणून बघत बसू का? या गद्दाराचे नामोनिशाण मिटवा", असा इशारा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.