ShivSenaUBT: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या तिघा माजी आमदारांना ठाकरेंच्या शिवसेनेची रसद?

Kagal Assembly Constituency: कागल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महायुतीच्या व्यासपीठावर फिरताना दिसत आहेत.
ShivSenaUBT party
ShivSenaUBT partySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. या संबंधाची माहिती सचिव विनायक राऊत यांनी दिली.

एकीकडे पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची तात्काळ हाकालपट्टी होते. मात्र पहिल्या नेत्यांनी घेतलेली सोयीस्कर भूमिकेला पक्षप्रमुखांचीच रसद आहे का? असा सवाल होत आहे.

पक्षाच्या विरोधात जाऊन कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. मात्र दीड महिना उलटूनही कारवाई संदर्भात 'ब्र' सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena) काढलेला नाही. इतकेच नव्हे, तर काल दोन माजी आमदारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ShivSenaUBT party
Swabhimani Sanghatana: 'स्वाभिमानी'चा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; दोन माजी आमदार लावले गळाला!

पक्षशिस्त आणि नियम याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत कठोर नियम पाळले जातात. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील नियम भंग केल्याने जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. अवघ्या दोनच दिवसात त्यांच्यावरही कारवाई झाली.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढताना काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरे यांची शिवसेना एकत्र लढत आहे. जागा वाटपावरून एक मतदारसंघात एकत्र येऊन लढण्याचे सूत्र ठरले आहे. मात्र कागल विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर फिरत आहेत.

ShivSenaUBT party
Uddhav Thackeray: चोपडा मतदारसंघाचा उमेदवार बदला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाठली थेट "मातोश्री"

गेल्या दीड महिन्यांपासून त्यांनी थेट मुश्रीफ यांनाच पाठिंबा जाहीर केला आहे. वास्तविक महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांना ठाकरेंची शिवसेना म्हणून पाठिंबा देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी पक्षाच्या विरोधातच भूमिका घेत मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे.

कारवाई होत नसल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये देखील पक्षप्रमुखांचीच रसद असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. संजय घाडगे यांच्यावर अद्याप कारवाई का नाही? अशी चर्चा शक्तिप्रदर्शनच्या रॅलीमध्ये होती.

हातकणंगले आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघात पेच निर्माण झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतील दोन शिलेदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. थेट महाविकास आघाडी विरोधात बंड पुकारले असून पक्षाच्या धोरण विरोधात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात घेतला आहे. शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील आणि हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिनचेकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

थेट महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना आव्हान देत निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे पक्षप्रमुखांची या तिघांच्या मागे रसद आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांना याबाबत संपर्क केला असता. त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com