Raju Shetti : सदाभाऊच्या वक्तव्याला फडणवीसांचे प्रोत्साहन; राजू शेट्टी संतापले

Raju Shetti on Sadabhau Khot: शरद पवार यांच्याविषयी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानावर राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : "सदाभाऊचे वक्तव्य निषेधार्य आहे. शरद पवार आणि माझे कधीच जमले नाही. त्यांच्या व्यंगावर आणि दुखण्यावर बोलणं हे मला पटलेलं नाही. कधीकाळी त्यांनी माझी जात काढली होती. पण त्यांना मी उत्तर दिलं नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती विसरले नाहीत. त्यांनी कधीच आपली पातळी सोडली नव्हती. पृथ्वीराज चव्हाण असेपर्यंतच महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती टिकली", असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

"शरद पवार यांच्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य होत असताना त्या पक्षातील नेते व्यासपीठावर हसत होते. त्याला हसून दाद देणे म्हणजे संताप आणणारे कृत्य आहे. त्यावर हसणे म्हणजे त्यांचे त्याला प्रस्तावना होती", असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केला.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीची उमेदवार अरुण सोनवणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यावेळी राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, "हद्दवाढीच्या नावाखाली ग्रामीण भागातील जमिनीवर आरक्षण टाकण्याची भीती घालून जमिनी खरेदी केल्या. जमिनी खरेदी करून उपनगरात गुंठामंत्र्यांनी अमाप पैसा कमावला. या सर्वांमध्ये दक्षिणमधील उपनगर आणि ग्रामीण भाग भरडला जातोय. दक्षिणमधील गावांकडे अमोल महाडिक आणि बंटी पाटील यांनी देखील लक्ष दिलं नाही. ज्यावेळी असे प्रश्न घेऊन सामान्य नागरिक या दोघांकडे जातात, त्यावेळी ते दुर्लक्ष करतात. कारण गुंठामंत्र्याचे संबंध ते जोपासत असतात". त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन महाशक्तीकडून अरुण सोनवणे यांना उमेदवारी देण्यात असल्याचं शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti
Sharad Pawar: 'मविआ'चे किती आमदार निवडून येणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आकडा जाहीर

"परिवर्तन महाशक्ती आघाडीचे आव्हान पेलवत नाही आणि आमच्या उमेदवार जड जात असल्यानेच फोडाफोडीचा प्रयत्न केला जात आहे. पण आमचं दुःख हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा कमी आहे. दोन गेले असले तरी दोन माजी आमदार आमच्या पक्षात आलेत. जिल्ह्यात दोन स्वाभिमानीचे आमदार दिसतील आणि मुसंडी ही दिसेल. संघटना फोडली की राजू शेट्टी कुमकुवत होतील, असे अनेकांना वाटते. पण जुना गेला की नवा लगेच तयार होतो, हे चळवळीच वैशिष्ट्य आहे. मी थांबलो तरी चळवळ थांबणार नाही", असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.

Raju Shetti
Prakash Abitkar : 'रात्री झोपताना एका पक्षात, सकाळी दुसऱ्याच पक्षात'; आबिटकर म्हणतात, 'केपीच महागद्दार'

"राज्यात परिवर्तन महाशक्तीला लक्षणीय यश मिळणार आहे. तो धक्का सहन होत नसल्यानेच आमची कार्यकर्ता फोडण्याची वेळ आली आहे. जेवढा चेंडू दाबाल तेवढाच तो वर येईल", असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com