Sanjay Mandlik : लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही मंडलिक अडचणीत; कागलमध्ये कोणाला बळ देणार?

Sanjay Mandlik Hasan Mushrif Samarjit Ghatge : पालकमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे हे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत. दोघांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge
Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Mandlik News : आगामी विधानसभा निवडणुकी महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत धोरण निश्चित नसताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी आतापासूनच सावध पावले उचलले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहायचे की भाजपचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या सोबत राहायचे? याची अडचण माजी खासदार संजय मंडलिक आणि त्यांच्या गटाला झाली आहे.

राज्यात महायुती कोणता निर्णय घेण्यात यावरच माजी खासदार संजय मंडलिक यांची राजकीय भूमिका अवलंबून आहे. महायुतीमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास कागलच्या राजकारणात नवी समीकरणे जुळलेली पाहायला मिळतील. सध्यातरी मंडलिक यांनी मुश्रीफ आणि घाटगे हे दोघेही आपले मित्र असल्याची भूमिका घेतली आहे.

राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते समरजित घाटगे हे देखील सत्ताधारी गटात असल्याने या मतदारसंघातून महायुतीला लोकसभेला मताधिक्य मिळेल, असा महायुती नेत्यांचा अंदाज होता. मात्र राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीच्या निकालात कमी मताधिक्य मिळाले.

Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge
Sambahjiraje : शाहू महाराज-बाबासाहेब आंबेडकरांचे वारस एकत्र येणार? विधानसभेपूर्वी संभाजीराजेंचे मोठे संकेत

अशा परिस्थितीत महायुतीतील कोणत्या नेत्याचे बळ शाहू महाराज छत्रपती यांच्या मागे उभे राहिले यावरून युतीतील नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. अशा परिस्थितीत माजी खासदार संजय मंडलिक यांनी मेळावा घेत माझ्या पराभवाला खापर कोणावरही न फोडता पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

आगामी विधानसभा अवघ्या दोन महिन्यांवर आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे हे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक आहेत. दोघांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे कोणाला बळ द्यायचे असा पेच माजी खासदार मंडलिक यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांनी वेट आणि वॉच ची भूमिका घेतली आहे.

महायुतीमध्ये जर विधानसभा निवडणूक एकत्र लढायचे झाल्यास ज्येष्ठत्वाच्या नात्याने महायुतीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ असू शकतात. तर घाटगे हे बंडखोरी करू शकतात हे अटळ आहे. जर स्वतंत्र निवडणुका झाल्यास कागलच्या राजकारणात नवी समीकरणे जुळू शकतात. हे निश्चित मानले जातात.

(Edited by Roshan More)

Sanjay Mandlik, Hasan Mushrif Vs Samarjit Ghatge
Prakash Abitkar : 'भ्रष्टाचाराचा महामेरू, बिद्रीचा लुटारू'; आमदार आबिटकरांनी के पी पाटलांना डिवचले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com