Balu Mama Temple : बाळूमामांच्या दरबारात 60 कोटींचा घोटाळा, धर्मादाय निरीक्षक व सचिवावर गुन्हा, अधिकारी निलंबित

Kolhapur Temple Scam : संत बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारात ६० कोटींच्या अपहार उघड झाल्याने भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात तत्कालीन प्रशासक व कार्याध्यक्षा धर्मादाय निरीक्षक, देवस्थान सचिव यांच्यासह सर्व संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आदींचा त्यात समावेश आहे.
Officials investigate the alleged ₹60 crore financial scam at Shri Sant Balu Mama Temple in Kolhapur.
Officials investigate the alleged ₹60 crore financial scam at Shri Sant Balu Mama Temple in Kolhapur. The Balu Mama Temple Scam involves land transactions and temple fund irregularities.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 Jul : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री संत बाळूमामा देवस्थान समिती रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी गैरव्यवहार तर कधी विश्वास्तांमधील हाणामारी यावरून गेल्या दोन वर्षात समिती चांगलीच चर्चेत आहे. अशातच आता 60 कोटीच्या घोटाळ्याने पुन्हा एकदा देवस्थान समिती चर्चेत आली आहे.

संत बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारात ६० कोटींच्या अपहार उघड झाल्याने भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात तत्कालीन प्रशासक व कार्याध्यक्षा धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजारराव खडके (रा. कोल्हापूर) व संत बाळूमामा देवस्थान सचिव रावसाहेब बिराप्पा कोणकेरी (रा. भडगाव, गडहिंग्लज) यांच्यासह सर्व संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आदींचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील मेंढी विक्री व्यवहार, जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी (रा. बदलापूर, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

मंदिरातील व्यवहारांतील गैरव्यवहारांमुळे खडके यांची देवस्थान समितीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु, देवस्थानमधील अनेक गैरव्यवहारात त्यांचाच सहभाग समोर आल्याने महिन्याभरापूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जमीनींचे व्यवहार, मेंढी विक्री व्यवहारात घोटाळ्याचे आरोप होत असल्याने धर्मादाय आयुक्तालयाच्या मुंबई कार्यालयातून तपासणीचे आदेश देण्यात आले होते.

Officials investigate the alleged ₹60 crore financial scam at Shri Sant Balu Mama Temple in Kolhapur.
Shiv Sena UBT : ओमराजेंसह 6 खासदारांना विलीनीकरण भोवणार? अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंची 'सुप्रीम' चाल...

मार्च २०२० ते मार्च २०२६ कालावधीतील देवस्थान समिती व्यवहारांत तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार रुपयांचे गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले होते. पंधरा महिन्यांच्या कालावधीतील व्यवहारांच्या तपासणीत १५ हजार रुपये किमतीच्या बकऱ्याची विक्री केवळ पाच हजार ५०० रुपयांत झाल्याचे समोर आले. यातून जवळपास ४१ कोटींचा अपहार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर दहा ते बारा जमिनींच्या व्यवहारांमध्येही गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

Officials investigate the alleged ₹60 crore financial scam at Shri Sant Balu Mama Temple in Kolhapur.
Sadabhau Khot : "धर्मेंद्र प्रधानांचा अजिबात राजीनामा घेऊ नका; या आतंकवाद्यांना..."; CJP च्या आंदोलनावर टीका करताना सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य

गैरव्यवहारांची एकूण रक्कम ६० कोटींच्या घरात जात असल्याचे समोर आले. जमीन खरेदी-विक्रीमध्येही बनावट कागदपत्रे बनविणे, खोटे दस्ताऐवज बनवणे, पुरावे नष्ट करण्याचे आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आले आहे.

भूदरगड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. तरी या प्रकरणातील एकाही संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com