

Pandharpur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काही दिवसांपूर्वी पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना पवार यांच्या उपस्थितीत अभिजीत पाटील Abhijit Patil) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे अभिजीत पाटील यांनी पंढरपूर मतदासंघातून उमेदवारी मिळणाची अधिक शक्यता आहे, याचे संकेत शरद पवारांकडूनच देण्यात आले होते.
शरद पवार यांच्या पाटील उमेदवारीबाबतच्या संकेतामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirat Bhalke) नाराज आहेत, अशी चर्चा सुरू आहे. ते लवकच के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडून भालके यांना फोनवरून संवाद साधण्यात आल्याचे समजते आहे. कोणताही निर्णय घेताना घाई नको, असा सबुरीचा सल्ला भालके यांना देण्यात आला आहे.
यावर भालके यांनी आपण अजूनही बीआरएसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान सध्या मतदारसंघातील लोक आणि आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे भालके यांनी सांगितले आहे. यामुळे भालके नेमके कुठे असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवारांनी काय म्हणाले होते?
पंढरपूरचे भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी उणीव भासत आहे. ते भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील हे निश्चितपणे करतील. आज मात्र अभिजीत पाटील यांच्या रूपाने तुम्ही सर्वांनी नेतृत्व तयार केलं आहे, त्यांच्या पाटीशी निश्चितपण राहण्याचं काम करा, असं पवार म्हणाले होते.
एकप्रकारे शरद पवार यांनी अभिजित पाटलांची उमेदवारी निश्चित केली, अशी चर्चा होत गेली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भगीरथ भालके नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.