

Kolhapur News : राज्यभरात सध्या डॉल्बीवरून तणावाचे वातावरण आहे. नागपूरमध्ये डॉल्बीला बंदी घालण्यात आली असून पुण्यातदेखील गणेशोत्सव काळात डॉल्बीला बंदी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशातच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिडे गुरुजी यांनी डॉल्बीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
इतकेच नव्हे, तर दहीहंडी यासह हिंदू सणात महिलांना नाचवणाऱ्या सार्वजनिक मंडळांना आणि व्यक्तींनाही भिडे गुरुजी यांनी लक्ष केलं आहे. भिडे गुरुजी यांनी अशा मंडळांसह व्यक्तींना देशद्रोही ठरवले आहे. शिरोळ तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करण्यासाठी निघालेल्या मोर्चात भिडे गुरुजी यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते.
हिंदू सण आणि उत्सवांमध्ये बायांना नाचवून अश्लील डान्स करणे हे मूर्खपणाचे लक्षण असून असे करणारे देशद्रोही आहेत. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजले नाही पाहिजेत. डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. त्यातून देशाला काय फायदा होतो आणि काय मिळते? दहीहंडी सणांमध्ये बायका नाचवणारे देशद्रोही असून त्यांनी ते चुकीचं काम केलं आहे, अशी कडाडून टीका भिडे गुरुजी यांनी केली आहे.
या देशात राहून खाणारे मराठे आहेत. त्यांची हक्काची जागा हिसकावून घेणे हे पाप आहे. या एमआयडीसीला पाठिंबा देणे म्हणजे पाकिस्तानला पाठिंबा देणे आहे. देशासाठी जगणारी जात ही मराठा जात आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. एमआयडीसी रद्द करायला सांगणार असून त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पेढा भरवला म्हणजे त्यांना मी बांधील नाही, अशा शब्दांत भिडे गुरुजी यांनी प्रस्तावित एमआयडीसीला विरोध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.