

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.
शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनात आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना टांगण्याची भाषा केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. अशातच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलन केल्याने संताप अनावर झालेल्या आमदार क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी थेट स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका चौकातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले तर महापालिकेच्या चौकाकडून त्याला आव्हान देणारा मोर्चा शिवसेनेकडून आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून काढण्यात आला. दोन्ही गट समोरासमोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतल्याने प्रसंग टळला.
आमदार क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या चौकातच पोलिसांनी रोखून धरले. तर आंदोलन आटपून घरी निघालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.