Vidya Lolge Warning to Sambhaji Bhide : भिडेंनी सांभाळून बोलावे; अन्यथा त्यांच्या मिशा कापून टाकू : सोलापुरातील महिला नेत्यांचा इशारा

Sambhaji Bhide's Controversial Statement : संभाजी भिडे यांनी येथून पुढे महिला या विषयावर बोलू नये. कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं, नाही तर आम्ही महिला भिडे यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराही विद्या लोलगे यांनी दिला आहे.
Vidya Lolge- Sambhaji Bhide
Vidya Lolge- Sambhaji BhideSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 July : वटपौर्णिमेच्या पुजेवरून पुण्यात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘शिवप्रतिष्ठान’चे प्रमुख संभाजी भिडे यांना सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा विधवा संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी खणखणीत इशारा दिला आहे. ‘संभाजी भिडे येथून पुढे जर महिलांवर बोलले, तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रविवारी सायंकाळी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुण्यात (Pune) आले होते. पुण्यात पालखी आल्यानंतर ते दरवर्षी पालखी सोहळ्यात पायी चालतात. पण, वादग्रस्त विधान करू नये, यासाठी त्यांना पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यानंतरही त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्रींनी किंवा ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. फक्त, साडी घातलेल्या महिलांनी वटसावित्रीची पूजा करावी.' असं विधान संभाजी भिडे यांनी रविवारी पुण्यात केले आहे. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याला सोलापुरातील विधवांसाठी काम करणाऱ्या विद्या लोलगे (Vidya Lolge) यांनी भिडे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.

संभाजी भिडे यांनी येथून पुढे महिला या विषयावर बोलू नये. कृपया त्यांनी स्वतःचं तोंड सांभाळावं, नाही तर आम्ही महिला संभाजी भिडे यांना महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही, असा इशाराही विद्या लोलगे यांनी दिला आहे.

भिडे यांचं आता खूप व्हायला लागलं आहे. महिलांवर बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे. येथून पुढे ते महिलांवर असं काही वादग्रस्त बोलले तर आम्ही सरळ जाऊन त्यांच्या मिशा कापून टाकू, असा इशाराही विद्या लोलगे यांनी दिला आहे.

Vidya Lolge- Sambhaji Bhide
Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर संकटमोचक महाजनांनी जोडले हात !

पालखी सोहळ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना त्यांना या नोटिशीद्वारे पुणे पोलिसांकडून देण्यात आली होती. कारण, काही वर्षांपूर्वी संभाजी भिडे आणि त्यांचे धारकरी हातात तलवारी, काठ्या घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झाले होत. त्यावरून मोठा वाद झाला होता. पालखी प्रमुखांनी संतांच्या पालख्या जागेवरच थांबवल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारीची नोटीस देण्यात आली होती.

पोलिसांच्या खरबदारीच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे यांनी महिलांच्या संदर्भात विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्याबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे, त्यातून सोलापूरच्या विद्या लोलगे यांनी भिडे यांच्याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आता हा वाद कुठचे वळण घेणार, हे पाहावे लागेल.

Vidya Lolge- Sambhaji Bhide
Anil Patil Vs Satish Patil : सतीश पाटलांचे वाभाडे काढताना अनिल पाटलांनी पुतण्याचा पराभव ते एरंडोलमधील मतदान सर्वच काढलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com