Amitesh Kumar News : पुणे पोलिस आयुक्तांचा पारा चढला, दिली 'फायनल वॉर्निंग'; म्हणाले, 'आमची दादागिरी काय असते ते..'

Pune Police In Action Mode : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण,ड्रग्ज प्रकरण,कोयता गँग यांसह अनेक घटनांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
C.P Amitesh Kumar
C.P Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच अमितेशकुमार यांनी शहरातील गुंडांची आयुक्तालयात परेड घेतली होती.या परेडमुळे वाढत्या गुन्हेगारीला चाप बसेल अशी आशा पुणेकरांमध्ये निर्माण झाली होती.पण गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी पुणेच हादरलं नाही तर अख्खं राज्य हादरलं अन् पुणे पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. याच धर्तीवर आता पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार 'अॅक्शन मोड'वर आले आहेत.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण,ड्रग्ज प्रकरण,कोयता गँग यांसह अनेक घटनांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.यात भर म्हणजे पुण्यातील नामांकित आणि कायम तरूणाईने गजबजलेल्या एफसी रोडवरील L3 बार पार्टीमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडिओने पुणे पोलिसांसह गृहखात्याचीही झोप उडवली आहे.विरोधकांनी याच मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षांसह पुणे पोलिसांचेही वाभाडे काढले.याचमुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन आमची दादागिरी काय असते ते दाखवून देवू असा इशारा देत गुन्हेगारांना सज्जड दम भरला आहे. ते म्हणाले, पोलिसांचा संयम आहे तोपर्यत संयम,तो एकदा का सुटला की कडक कारवाई करणार असल्याचा उच्चार त्यांनी केला.

तसेच कोणत्याही परिसरात मद्य किंवा अमली पदार्थांची विक्री, पोलिसांसोबत वाद घातला तर आम्ही पण भांडणार आहोत.आम्ही एक पाऊल पुढे जाऊन आमची दादागिरी काय असते ते दाखवून देवू.पुण्यात काही विपरीत करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई होणार, कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही जातीय सलोखा टिकणे गरजेचे आहे असा दमही त्यांनी दिला.

C.P Amitesh Kumar
VIDEO - Congress on Radhakrishna Vikhe : 'पालकमंत्री हरवले आहेत' म्हणत अकोल्यात काँग्रेसचं राधाकृष्ण विखेंवर टीकास्त्र!

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील 'एल 3' या हॉटेल बारमध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या प्रकारानंतर शहरातील बेकायदा पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.यामुळे गेले अनेक महिन्यांपासून झोपी गेलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आता खडबडून जागा झाला आहे.

गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणानंतर आतापर्यंत शहरातील 188 बार,पब यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली.

C.P Amitesh Kumar
Congress 3 MLA Suspended: काँग्रेसला दणका ; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर आणखी दोन आमदार निलंबित ; काय आहे प्रकरण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com