Ahmednagar Politics :
Ahmednagar Politics :Sarkarnama

Ahmednagar Politics : भिंगारकरांची मागणी थेट संसदेत उमटली; कँटाेन्मेंटला पालिकेत घेण्याची आग्रही भूमिका...

Sujay Vikhe On Bhingar Cantonment : याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चादेखील करण्यात आली आहे.

Ahmednagar Politics : सुमारे 1879 मध्ये स्थापन झालेल्या 'भिंगार छावणी परिषदेचे' लष्करी क्षेत्र वगळून, नागरी क्षेत्र हे अहमदनगर महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी सध्या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे आग्रही आहेत. यातच पुढील चार महिन्यांत याबाबतचा निर्णय होईल, अशी ग्वाहीदेखील खासदार विखेंनी भिंगारकरांना दिली होती. दरम्यान, या प्रश्नी गुरुवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विखे यांनी पुन्हा एकदा भिंगार कँटाेन्मेंट बोर्डाचा समावेश लवकरात लवकर नगर मनपामध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली. (Latest Marathi News)

Ahmednagar Politics :
Crime News: नगर जिल्ह्यात 400 ते 500 जणांच्या जमावाकडून दोन कुटुंबांवर प्राणघातक हल्ला; 71 जणांवर अॅट्राॅसिटीचा गुन्हा

भिंगारमधील नागरिकांना मोठ्या नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अहमदनगर महापालिकेत भिंगारचा समावेश करावा, ही अनेक वर्षांपासून भिंगारकरांची मागणी आहे. या अनुषंगाने भिंगार कँटाेन्मेंटला बोर्डाचा समावेश अहमदनगर महानगरपालिकेत व्हावा, याबाबतची मागणी खासदार सुजय विखे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली. याबाबत संरक्षणमंत्री यांच्याशी चर्चादेखील करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या मागणीचा विचार करता भिंगार कँटाेन्मेंटला येत्या तीन महिन्यांत अहमदनगर महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी या वेळी खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

संसदेत बोलतान खासदार विखे म्हणाले , "माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये भिंगार छावणी परिषदेची 1879 मध्ये स्थापना झाली. आजवर 25 हजार लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र, कँटाेन्मेंटला भाग हा लष्कराच्या अधिपत्याखाली येत असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बांधकाम परवानगी, नागरी समस्या अशा अनेक अडचणी नागरिकांना येत आहेत. यामुळे भिंगारचा समावेश नगर महानगरपालिकेत करण्यात यावा, अशी मागणी विखे यांनी करत भिंगारकरांची बाजू मांडली.

Ahmednagar Politics :
Nilesh Lanke: मीच नारळ फोडणार; फुकटचं श्रेय घेऊ नका; विखे पिता-पुत्रांवर लंकेचं टीकास्त्र

याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. तसेच भिंगारचे नागरिक यांचे मत जाणून घेण्यासाठी नगरमध्ये बैठक नुकतीच घेण्यात आली. यामध्ये नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून, येत्या काळात लवकरात लवकर भिंगार कँटाेन्मेंटचा समावेश अहमदनगर महापालिकेत करण्यात यावा, अशी मागणी या वेळी खासदार सुजय विखे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com