Ahmednagar Politics : नगरमध्ये 776 रस्त्यांचा भ्रष्टाचार; काँग्रेसच्या नेत्याने घेतली विश्वास नांगरे पाटलांची मुंबईत भेट

Congress Political News : नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार...
Kiran Kale - Vishwasrao Nangare Patil
Kiran Kale - Vishwasrao Nangare PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर महापालिका क्षेत्रातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट,टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती.

दरम्यान,शुक्रवारी मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरेंची (Vishwasrao Nangare Patil) काळे यांनी समक्ष भेट घेत पुरावा सादर केले.भ्रष्टाचाराची मोठी व्याप्ती लक्षात घेता जलदगतीने याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केल्याची माहिती मिळाली. माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे उपस्थित होते.

Kiran Kale - Vishwasrao Nangare Patil
Vidhansabha winter Session : नागपूर थंडीने गारठण्यापूर्वीच काँग्रेसला भरली हुडहुडी !

किरण काळे म्हणाले, "नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत".

या सगळ्याचे मूळ हे शहरातील 776 रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार यामध्ये दडलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ते होऊन देखील मनपा प्रशासन काही राजकीय पाठबळ असणाऱ्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचार दडपत आहेत, असा आरोपही किरण काळे (Kiran Kale) यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, विश्वास नांगरे पाटील यांनी लासलुचपत विभागाच्या नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर - घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले आहेत. काळे यांनी देखील याबाबत दूरध्वनीवरून घारगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे देखील शासनाच्या आस्थापनेच्या नावे बनावट शिक्के, लेटर हेड, दस्तऐवज तयार केल्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.(Fraud Scam)

(Edited By Deepak Kulkarni)

Kiran Kale - Vishwasrao Nangare Patil
Uddhav Thackeray Big Claim : शिंदे सरकारच्या काळात 8 हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com