BJP ZP Candidate : जिल्हा परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला?; मोहोळमधील 'या' गटातून करणार उमेदवारी

Zilla Parishad Election 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी हालचाली वाढल्या असून मोहोळ तालुक्यातील कुरुल गटासाठी भाजपचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे.
BJP ZP Candidate
BJP ZP CandidateSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 January : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळीने वेग घेतलेला असतानाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जोरदार हालचाली सुरू आहे. विशेषतः जिल्हा परिषदेसाठी उमेदवार निश्चितीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षांकडून इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे सांगितले जात असून मोहोळ तालुक्यातील कुरुल गटाचा पक्षाचा उमेदवार ठरल्याची माहिती पुढे येत आहे. तसे संबंधित उमेदवाराने आपल्याला पक्षश्रेष्ठींकडून ग्रीन सिंग्नल मिळाल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शहरातील नेतेमंडळी व्यस्त असताना ग्रामीण भागातील नेते हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. निवडून येण्याच्या निकषांवर मातब्बरांना गळाला लावण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत.

मोहोळ (Mohol) तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटाचा भाजपचा उमेदवार ठरल्याचे पुढे येत आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला उमेदवारीचा शब्द मिळाला आहे, असा दावा कुरुल गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले ‘जकराया शुगर’चे अध्यक्ष सचिन जाधव यांनी केला आहे. मोहोळ नगरपरिषदेतील भाजपचे विजयी उमेदवाराचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जाधव यांनी हा दावा केला आहे.

BJP ZP Candidate
Siddhi Vastre : राज्यातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षांच्या विरोधात पद्‌भार घेण्याच्या दिवशीच तक्रार दाखल

जनतेची कामे झाली पाहिजेत, यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कुरुल जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचा शब्द मला पक्षनेतृत्वाने दिला आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी कुरुल गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या नेत्यावर टीका केली आहे. कुरुल जिल्हा परिषद गटातील जनता बाहेरचा गेटकेन उमेदवार स्वीकारणार नाही, असेही माजी उपसभापती जालिंदर लांडे यांनी स्पष्ट केले.

BJP ZP Candidate
Subhash Deshmukh : नाराज सुभाष देशमुखांनी विमानतळावरच गाठले प्रदेशाध्यक्ष चव्हाणांना; बोलून दाखवली मनातील खंत...

आपल्या राजकीय स्वार्थासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनगरच्या पाटील परिवारावर टीका करून जनतेचे मनोरंजन करणारा एक नेता कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. त्यांचे स्वतःचे काहीच कर्तृत्व नाही, फक्त दुसऱ्यावर द्वेषभावनेतून टीका करायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा. हा त्यांचा धंदा आहे, असा टोलाही संबंधित नेत्याला राजन पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com