Shambhuraj Desai : सातारा जिल्हा बॅंकेबाबत भाजपचा स्वबळाचा नारा; ZPत धक्काबुक्की झालेल्या शंभूराज देसाईंची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा डीसीसी बँक निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी जाहीर केले. शिवसेनेने मात्र स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाची वाट पाहत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 23 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बॅंकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व निवडणुकीबाबत निर्णय घेईल, असे सांगितले. तर पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी पक्ष 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेच्या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेली आहे.

सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (शिंदे गट) अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेना 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे, असे संकेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. ते आज माध्यमांशी बोलत असताना त्याबाबत स्पष्ट केले.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सध्या निवडणुकीसाठीच्या ठराव संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर कच्च्या, पक्क्या मतदार याद्या प्रसिद्ध होतील. ती सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेना अधिकृत भूमिका जाहीर करेल.

Shambhuraj Desai
Satara Politic's : भाजप मंत्र्याच्या पत्नीची सातारा जिल्हा बॅंकेत एन्ट्री निश्चित; बॅंकेची सूत्रं कायम हाती राहणार!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मूळ चिन्ह 'धनुष्यबाण' गोठवण्याची मागणी केली आहे. त्यावर मत विचारल्यानंतर देसाई यांनी त्याचा जोरदार समाचार घेतला.

Shambhuraj Desai
Satara Dcc Bank : गोरेंनी सातारा DCC स्वबळाचे लढण्याचे संकेत देताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान : ‘आम्ही काय सोडणार आहोत काय?’

ते म्हणाले, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गोठवण्यासारखे आहेत, संजय राऊत यांच्या वक्तव्याचा शिवसैनिक तीव्र निषेध करत आहेत. जिथे संजय राऊत दिसतील, तिथे शिवसैनिक त्यांना त्या विधानाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com