Satara Politic's : भाजप मंत्र्याच्या पत्नीची सातारा जिल्हा बॅंकेत एन्ट्री निश्चित; बॅंकेची सूत्रं कायम हाती राहणार!

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा डीसीसी बँकेची निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढवणार आहे. दहा वर्षांच्या नियमामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह असताना पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांच्या उमेदवारीची शक्यता वाढली आहे.
Vedantikaraje Bhosale
Vedantikaraje BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Satara, 23 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक भारतीय जतना पक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेच्या दहा वर्षांच्या नियमांमुळे खुद्द शिवेंद्रराजे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हा खरा प्रश्न आहे. मात्र, मंंत्री शिवेंद्रराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता बळावली आहे. त्यांच्या नावाचा ठरावही सातारा तालुक्यातून झाला आहे, त्यामुळे वेदांतिकाराजेंची जिल्हा बॅंकेतील एन्ट्री निश्चित मानली जात आहे.

रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या नियमानुसार सलग १० वर्षे जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्यांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यांना तीन वर्षांच्या कुलिंग पीरियडनंतर पुन्हा संचालक म्हणून संधी मिळणार आहे. पण राज्याच्या सहकार विभागाने तो नियम अजून स्वीकारलेला नाही, असे सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, तक्रार केली तर त्यांचे संचालकपद जाऊ शकते, असे राज्य सरकारच्या निर्णयात म्हटलेले आहे, त्यामुळे रिस्क न घेता नेतेमंडळींनी पर्यायाची चाचपणी सुरू केली आहे. त्यातूनच होऊ घातलेल्या सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सोसायटी मतदारसंघात वर्चस्व आहे. आतापर्यंत शिवेंद्रराजे हे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कायम विजयी होत आलेले आहेत. पण नव्या नियमामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या राजकारणात आतापर्यंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व राहिलेले आहे. मागच्या निवडणुकीत ते जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडले गेले होते. तो दबदबा अजूनही कायम आहे. पण नव्या नियमांच्या संभ्रमावस्थेमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांची जिल्हा बॅंकेत एन्ट्रीची होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Vedantikaraje Bhosale
Satara Dcc Bank : गोरेंनी सातारा DCC स्वबळाचे लढण्याचे संकेत देताच शिवसेना नेत्याचं मोठं विधान : ‘आम्ही काय सोडणार आहोत काय?’

वेदांतिकाराजे भोसले यांच्या नावाचा ठराव आष्टे विकास सोसायटीकडून करण्यात आला आहे. तसेच, खुद्द शिवेंद्रराजे भोसले यांच्याही नावाचा ठराव रामकृष्णनगरमधून झालेला आहे, तर मंत्री भोसले यांचे निकटवर्तीय जितेंद्र सावंत यांच्या नावाचा ठराव लिंब सोसायटीतून, मांडवे सोसायटीमधून शिवेंद्रराजे समर्थक विक्रम पवार यांच्या नावाचा ठराव झालेला आहे, त्यामुळे वेदांतिकाराजे भोसले यांची जिल्हा बॅंकेतील एन्ट्री निश्चित मानली जात आहे. सातारा विकास सोसायटी मतदारसंघातून एकूण १४६ ठराव झाले आहेत.

Vedantikaraje Bhosale
Sangola Politic's : गणपतआबांनी कायम कार्यकर्त्याला संधी दिलेल्या सांगोल्यातून यंदा DCC त कोण येणार? : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या निर्णयाकडे लक्ष

नव्या नियमांमुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बॅंकेतील एन्ट्रीस अडथळा निर्माण झाल्यास बॅंकेची सूत्रे हाती राहण्यासाठी वेदांतिकाराजे भोसले यांची जिल्हा बॅंकेत शंभर टक्के एन्ट्री होणार, असे मानले जात आहे. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह आणखी कोणत्या समर्थकाला जिल्हा बॅंकेत जाण्यासाठी हिरवा कंदील दाखवला जातो, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com