Suresh Halvankar News : आता राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये तरी हळवणकरांना संधी मिळणार का?

Governor nominated MLA : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्ये म्हणत हळवणकरांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी.
Bawankule and Halwankar
Bawankule and HalwankarSarkarnama
Published on
Updated on

Halvankar latest news : विधानपरिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख जाहीर केली गेली. भाजपकडून तीन राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे पाच उमेदवारांचे अर्ज करण्यात आले. भाजपकडून इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांना अशा होती.

मात्र या ठिकाणी त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांची निराशा वाढली आहे. पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्यासाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले. त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये हळवणकर यांना संधी मिळणार का? याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मात्र कार्यकर्त्यांची नाराजी कायम आहे.

Bawankule and Halwankar
Prashant Kortkar : प्रशांत कोरटकरच्या अडचणी आणखी वाढणार; पुरावा नष्ट केल्यासंदर्भात गुन्हा नोंद करण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी इचलकरंजी येथे हळवणकरांना उमेदवारीपासून दूर ठेवले होते, मात्र माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधानपरिषदेचा शब्दही देण्यात आला होता. त्यानंतर मागीलवेळी विधानपरिषदेतील पाच आमदार आता विधानसभेत गेल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक लागल्याने, या रिक्त जागांवर हाळवणकर यांना संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र त्यांना डावलून आणि तिघांना संधी दिल्याने कार्यकर्त्यांची नाराजी आहे.

Bawankule and Halwankar
Raju Shetti : राज्यकर्ते, औरंगजेबापेक्षाही क्रूर, राजू शेट्टींनी काढले महायुती सरकारचे वाभाडे...

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शब्द फिरवला? -

विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर(Suresh Halvankar) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच विधानपरिषदेचा शब्द दिल्याने कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला. मात्र त्यांनीच शब्द फिरवला अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आता न्याय मागायचा कोणाकडे असा सवाल कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

आमदार राहुल आवाडे यांचा पक्ष ताराराणी आघाडी ही भाजपमध्ये विलीन होईल अशी चर्चा जोरात सुरू होती. विधानसभा निवडणूक उलटूनही अजूनही ताराराणी आघाडी ही भाजपात विलीन झालेली नाही. शिवाय आमदार आवाडे यांचा भाजप कार्यालयाशी संपर्क सध्या तरी अजूनही कमी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताराराणी आघाडी स्वतंत्र लढणार की भाजपसोबत लढणार याची चर्चा सुद्धा जोरात सुरू आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com