BJP Offer to Mahesh Shinde : शिवसेना आमदार महेश शिंदेंना भाजपची दुसऱ्यांदा ऑफर; ‘ज्यांना ज्यांना डावललं जातंय, त्यांचा आमच्याकडे सन्मान...’

Satara Shivsena Vs BJP : महेश शिंदे यांच्यावर कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. यामुळे साताऱ्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
Mahesh Shinde
Mahesh ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 May : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाईचे संकेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले. त्यानंतर महेश शिंदे नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू असतानाच ग्रामविकास मंंत्री जयकुमार गोरे यांनी शिंदेंना दुसऱ्यांदा भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे. ‘ज्यांना ज्यांना कोणाला डावललं जातंय, त्यांचा आमच्याकडे सन्मान आहे,’ अशा शब्दांत यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यानुषंगाने घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, आमदार महेश शिंदे हे आमच्यासोबत आले, कारण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची निवडणूकपूर्व युती होती. त्यामुळे ते युतीसोबत राहिले.

आता कुणाला काय वाटतं, हा ज्याचा त्याचा विषय आहे. पण, कुठल्याही परिस्थितीत आम्ही महेश शिंदे (Mahesh Shinde) यांच्या पाठीशी उभे आहोत. कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, यापेक्षा भारतीय जनता पक्ष आमदार महेश शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही गोरे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, आमदार महेश शिंदे हे त्यांच्या शिवसेना पक्षात खुश असतील, असं मला वाटतंय. त्यांना कधी वाटलं की भारतीय जनता पक्षात यावं. पण ते पूर्वीचे भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यामुळे ते नव्याने भारतीय जतना पक्षात येतात, असं नाही.

Mahesh Shinde
Satara Politic's : महेश शिंदेंचा देसाईंवर पलटवार : पालकमंत्री चांगलं काम करताहेत, शिंदे बोलावतील तेव्हा जाईन, माझ्याकडं आणखी साडेतीन वर्षे...

आमदार महेश शिंदे यांचे भारतीय जनता पक्षात नक्की स्वागत असेल. पण, माझी भावना अशी आहे की, आम्ही महायुती म्हणून काम करतोय. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, शिवसेनेच्या बॅनरवर त्यांचे फोटो नसतात, त्यांना डावलंल जातंय, हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. पण ज्यांना ज्यांना कोणाला डावललं जातंय, त्यांचा आमच्याकडे सन्मान आहे.

Mahesh Shinde
Jyoti Waghmare : ‘मैदानात उतरून लढण्याची ताकद तुमच्या मालकाची नाही अन्‌ ते मान्य करण्याची हिम्मत बोलक्या पोपटात नाही’

संजय शिरसाट यांना प्रत्त्युतर

संजय शिरसाट आणि आम्ही एका मंत्रिमंडळात काम करतोय. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचो असतो. जसं ते शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न करतात, तसं आम्हीही भाजप वाढवतो. आम्हाला पक्षाकडून, मुख्यमंत्र्यांना संघटना वाढविण्याचे टार्गेट दिले जाते. राजकारणात कधी काय होतं, हे सांगण्याची गरज नाही, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com