Maharashtra Politics : काँग्रेसच्या आमदाराला भर सभेत भाजपची खुली ऑफर; '2047 पर्यंत तुम्हाला संधी नाही, 2029 लाच प्रयत्न करा'

Chandrashekhar Bawankule BJP offer to Vijay Wadettiwar : कोल्हापुरात आज (ता. २३) तेली समाजाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली.
Maharashtra Politics; Chandrashekhar Bawankule And Vijay Wadettiwar
Maharashtra Politics; Chandrashekhar Bawankule And Vijay Wadettiwarsarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : कोल्हापुरातील तेली समाज मेळाव्यात महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दोघेही एकत्र दिसले. यावेळी भर सभेत वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी दिलेल्या या ऑफरमुळे आता राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकारण तापले आहे. तर बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हापुरात आज (ता. २३) तेली समाजाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक करत राजकीय टोलेबाजीही केली. वडेट्टीवार यांनी बावनकुळेंवर कौतुकाचा वर्षाव करत आठवड्यातून दोन तास समाजाच्या विकासासाठी वेळ द्या, हा समाज तुम्हाला कधीही मागे टाकणार नाही, असे म्हणाले.

तसेच आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे, असे म्हणत 2029 ला आमचा नंबर लागला, माझी तारीफ करायला सुद्धा आपण पाहिजे, असा टोला लगावला. तर राज्यात तुम्ही दोन नंबरचे नेते असून, तुमची जबाबदारी जास्त आहे. आपल्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्या समाजाचे महामंडळ निर्माण झाले पाहिजे, हजारो कोटी रुपये मिळावेत, अशी मागणीदेखील वडेट्टीवार यांनी केली.

Maharashtra Politics; Chandrashekhar Bawankule And Vijay Wadettiwar
Maharashtra Politics Live Update : मुंबईतील धक्कादायक घटना,लोकलमधून प्रवाशाला किरकोळ वादातून वांद्रे खाडीजवळ ढकलून दिलं

यानंतर भर सभेत बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्या भाषणाचा धागा पकडत मिश्कील वक्तव्य केले. त्यांनी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विरोधी पक्षात ताकद असलेला नेता म्हणून वडेट्टीवार यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभेत त्यांचा आवाज कणखर आहे. त्यांचे भाषण संपेपर्यंत मी सभागृह सोडत नाही, असे म्हणाले.

यानंतर बावनकुळेंनी वडेट्टीवारांना थेट आपल्या भाषणात सभा सुरू असतानाच भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. ते म्हणाले, 2047 पर्यंत तुम्हाला संधी नाही. यामुळे 2029 लाच प्रयत्न करा, फार काळ तिकडे राहू नका. तुम्ही सत्तेच्या बाहेर न थांबता सत्तेत या, असे म्हणत भाजपची ऑफर दिली. तसेच आपण आणि देवेंद्र फडणवीस वडेट्टीवारांचे जवळचे मित्र असल्याचेही ते म्हणाले.

Maharashtra Politics; Chandrashekhar Bawankule And Vijay Wadettiwar
Maharashtra Politics : फडणवीसांचा एक निर्णय अन् राष्ट्रवादीला हक्काच्या पालकमंत्री पदावर सोडावे लागले पाणी; भाजप- शिवसेनेला लॉटरी

या ऑफरनंतर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, सभेनंतर बावनकुळेंनी आपल्या ऑफरवर युटर्न घेतल्याचे दिसले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना हा केवळ विनोदाचा भाग होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण आता भाजपच्या या खुली ऑफरला वडेट्टीवार कसा प्रतिसाद देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com